छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव मंच दिवा शहर यांच्या वतीने शिवराज्यभिषेक सोहळा आणि हॉस्पिटलमध्ये फळे वाटप करण्यात आलं

0
75

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

दिवा : छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव मंच दिवा शहर यांच्या वतीने समस्त दिवा शहरवासीयांच्या उपस्थितीत अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत राजा शिवछत्रपती शिवाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात हर्ष उल्हासात लहानथोरांच्या उपस्थितीमध्ये कोरोनाचे नियम, तसेच दिवा शहरातील कायदा-सुव्यवस्था लक्षात घेऊन दिव्यात संपन्न झाला. ह्याच सुवर्ण दिनाचे औचित्य साधून “सकल मराठा समाज दिवा शहर” यांच्या वतीने दिवा शहरातील हॉस्पिटल मधील रुग्णांना तसेच अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टर्स, परिचारिका, वार्ड-बॉय आणि मावशी यांना सामाजिक बांधिलकी जपून फळे वाटप करून एक शिवकार्य पार पाडलं.ज्यांनी ज्यांनी ह्या शिवकार्यात सढळ हस्ते मदत करून, तसेच स्वतः उपस्थित राहून मोलाच योगदान दिलं अशा सर्व शिवभक्तांचे,दिवा शहरवासीयांचे मनापासून शतशः आभार. अशाच प्रकारे आपण सर्वांनीच (सर्वधर्मीय) एकत्र एकाच शिव पिठावर येऊन आपल्या दिवा शहराला (एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ) सांस्कृतिक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी हातभार लावूया असे आव्हान करण्यात आले.

*दखल न्यूज भारत*