झोपलेल्या नाकर्त्या राज्यकर्त्यानो जागे व्हा ; दूध उत्पादक शेतकऱ्याला वाचवा- चंद्रशेखर बावनकुळे (माजी पालकमंत्री)

182

 

सुनील उत्तमराव साळवे(९६३७६६१३७८)
कार्यकारी संपादक, दखल न्यूज भारत नागपुर

अजनी-कामठी / नागपुर: १ आँगस्ट २०२०
भारत हा क्रृषी प्रधान देश आहे. शेतकरी हा बेभरवशाच्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो. त्यातल्या त्यात ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, विविध रोगराई, वाढते बिबियाणे, खतांचे भाव, खतांचा काळाबाजार यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशावेळी शेतकऱ्याकडे दुधाचा जोडधंदा असतो. आणि दुधाच्या जोडधंद्यातून तो स्वतःचा परिवार चालवतो.
कोरोना च्या या संकटात ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था दुधाच्या व्यवसायावर टिकली आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्याचा जोड धंदा म्हणून दूध व्यवसायाकडे बघितले जाते.मात्र महाविकास आघाडी सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी दुधाचे भाव कमी झाले. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे सरकारने दुधाला सरसकट एक लिटर मागे १० रुपये व दूध भुकटी ला किलो मागे ५० रुपये अनुदान थेट शेतकऱ्याच्या खात्यात द्यावे या मागणीसाठी आज नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील अजनी गावात राज्याचे माजी ऊर्जामंत्री तथा नागपुर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नेतृत्वाखाली या नाकर्त्या सरकार विरोधात महाएल्गार आंदोलन केले.याप्रसंगी दुध आंदोलन करतांना रस्त्यावर दुध न सांडवता या भागातील लहान बालकांना दुधाचे वाटप करण्यात आले.
नाकर्ते सरकारने जागे व्हा व दूध उत्पादक शेतकऱ्याच्या या प्रश्नांना गांभीर्याने घेऊन त्यावर त्वरित तोडगा काढावा अशी मागणी महाराष्ट्र भाजपा महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यावेळी प्रामुख्याने उपस्थित म्हणून आमदार टेकचंद सावरकर, (कामठी / मौदा वि .स.क्षेत्र), अनिल निधान(विरोधी पक्षनेता जि.प.नागपुर), मोहन माकड़े(जि.प.सदस्य), किशोर बेले,(अध्यक्ष कामठी तालुका), नरेश मोटघरे (विस्तारक कामठी/मौदा वि.स.क्षेत्र), अँड. आशीष वंजारी (अध्यक्ष किसान आघाड़ी कामठी तालुका), किरण राऊत (युवा मोर्चा अध्यक्ष कामठी ग्रामीण), पंकज वर्मा (भाजयुमो मोर्चा अध्यक्ष कामठी शहर),राजेश रंगारी (नगराध्यक्ष, महादुला नगरपंचायत), हर्षल हिंगनेकर (महामंत्री कामठी तालुका) प्रमोद शेंडे महामंत्री कुणाल कडू महामंत्री, सुनील तडस, चुडामन बेलेकर, मंगेश गचुळे, प्रीतम लोहसारवा आणि इतर समस्त कार्यकर्ता भाजपा किसान विकास आघाडी कामठी सहित असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.