क्रांतिवीर बिरसा मुंडा यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन…

0
40

रोहन आदेवार
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

वणी : भारतीय स्वातंत्र्य चळवळीत योगदान देणारे सर्वात युवा क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सरकारशी प्रचंड संघर्ष केला पण अनावधानाने त्यांना ब्रिटिशांनी फितुरांच्या माध्यमातून पकडले व फाशीची शिक्षा दिली. त्यावेळी त्यांचं वय अवघे 25 वर्ष होते. अश्या महान व युवा क्रांतिकारक यांना विनम्र अभिवादन!
आज महापुरुष विचार प्रचार प्रसार व स्मारक संवर्धन समितीचे वतीने क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या वार्ड क्र 23 मधील तैलचित्राला हारार्पण व फुलार्पण करून अभिवादन केले.

यावेळी समितीचे मार्गदर्शक कुंतलेश्वर तुरविले, संघटक कासार सागर मुने, समनव्यक लोकसेवक अमित उपाध्ये, सदस्य युवा काँग्रेस नेते विकेश पानघाटे , सदस्य इजि चैतन्य तुरविले, राकेश डाकोरे, नीरज चौधरी, हर्षल बिडकर, बंडू परचाके,रामू थोंबरामे व परिसरातील नागरिक उपस्थित होते.