अहेरी येथे महाविकास आघाडी सरकार विरोधात विज बिलांची होळी

0
87

प्रतिनिधी /रमेश बामनकर

गुड्डीगुडम : अहेरी येथील
राजे विश्वेश्वर महाराज चौकात भारतीय जनता पक्षातर्फे राज्य शासणाचा निषेध करण्यात आला व विज बिलांची होळी करण्यात आली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून प्रत्येक गोष्टींमध्ये जनतेला वेठीस धरण्याचे काम हे सरकार करीत आहे. अगोदरच आर्थिक अडचणीत असणाऱ्या सामान्य माणसाला कोणताही आधार न देता उलट विजेचे ४ पट बिल देऊन मोठा धक्का दिला आहे. तसेच दूध उत्पादकांना भाजपा सरकारच्या काळात देण्यात येणारी प्रती लिटर ५ रु सबसिडी बंद करून राज्यातील जनतेवर राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या महाविकास आघाडीच्या सरकारने मोठा आघात केला आहे. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर राज्यातील सरकार सामान्य जनतेच्या भावनांशी खेळत असल्याने व सर्वच कामात अपयशी ठरलेल्या या सरकारने आता जनतेच्या विरोधात निर्णय दिल्यास त्याचे गंभीर परिणाम या सरकारला भोगावे लागेल असा ईशारा भाजप पदाधिकार्‍यांनी दिला. सरकारने तातडीने मागील ४ महिन्यांचे वीजबिल माफ करावे व दूध उत्पादकांना प्रती लिटर १० रुपये सबसिडी द्यावी, दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर देण्यात यावा, दूध भुकटीच्या निर्यातीला प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी घेवून महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात ‘महाएल्गार आंदोलन’ करण्यात आले.
आंदोलनात जिल्हा महासचिव सदिपजी कोरेत, तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, अहेरी नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौ.हर्षाताईठाकरे, ऊपाध्यक्षा कमलाताई पडगेलवार, पं. स. सदस्य प्रशांत डोंगे, न. प. सदस्य श्रीनिवास चटारे, नारायण सिडाम, अमोल गुडेल्लीवार, शंकर मगडीवार, सचिन पेद्दापल्लीवार, संतोष येमुलवार, तालुका महामंत्री मुकेश नामेवार, संजय अलोणे, दिलीप पडगेलवार इ. पदाधिकारी उपस्थित होते.