सुकाळा येथे दलितवस्ती योजनेतून सिमेंट रस्ते तयार करा – नागरिकांची मागणी

0
47

 

 

सुकाळा :- गावाचा सर्वांगीण विकास करण्याकरिता तसेच गावातील मिनी मंत्रालय म्हणून ग्रामपंचायत ओळखली जाते .या ग्रामपंचायतच्या वतीने गावांमध्ये विकासाचे कामे केले जातात त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास होण्यास ग्रामपंचायतचा हातभार विशेष असतो .कोरोना काळात सुद्धा ग्रामपंचायत ना मोठ्या प्रमाणात निधी येत असतो त्या निधीचा वापर योग्य ठिकाणी करायला पाहिजे अशी नागरिकांची मागणी असते .परंतु सुकाळा येथील अनेक वर्षांपासून नागरिक दलित वस्ती योजनेअंतर्गत सिमेंट रस्त्याची मागणी करत आहेत पण ती मागणी पूर्ण झालेली नाही .या वस्तीमध्ये पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य निर्माण होत असते . शासनाकडून ग्रामपंचायतला विविध निधी येत असतो तो निधी त्या गावात आणि दलित वस्तीत रस्ते, नाली बांधकाम, विहीर, लाईटची व्यवस्था अश्या अनेक योजनेवर खर्च करून त्यांना विकास करायचा असतो पण तो निधी खर्च न करता जाते कुठे?हा एक गंभीर प्रश्न आहे .त्यामुळे दलित वस्तीकडे लक्ष देऊन दलित वस्तीत सिमेंट रस्ते तयार करा अशी मागणी सुकाळा येथील दलितवस्ती मधील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे.