कोरोनामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पहिला मृत्यू…… चंद्रपूर जिह्यातील बाधितांची संख्या 536……

363

प्रेम गावंडे
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज 1 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कोरोना आजारामुळे 42 वर्षीय बाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील हा कोरोनामुळे झालेला पहिला मृत्यू आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार 30 जुलै रोजी 42 वर्षीय युवकाला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आल्यापासून हा रुग्ण ऑक्सिजनवर होता. आज दुपारच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला. चंद्रपूर शहरातील रहमत नगर येथील रहिवासी असणारा हा रूग्ण 30 जुलैला रात्री अकरा वाजता दाखल झाला होता.