मोबाईल फोन वरून अज्ञात आरोपीने केली आर्थिक फसवणुक

0
71

 

कन्हान (ता प्र): -कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गणेश नगर येथील राहणारा फिर्यादी निरज भास्कर बागडे यांना मोबाइल वर सिम बंद होण्याचा मॅसेज आल्याने फिर्यादी ने मॅसेज मध्ये नमुद असलेल्या मोबाइल नंबर वर काॅल केले असता फिर्यादीचे खात्यातुन एकुण १८,८०८ काढल्याने फिर्यादीं ची फसवणुक केल्या प्रकरणी कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार (दि.२८) मे २१ चे दुपारी २.३७ ते २.५० वाजता च्या सुमारास फिर्यादी निरज भास्कर बागडे वय ४५ वर्ष रा. गणेश नगर कन्हान यांच्या मोबाईल फोन वर त्याचे सिम बंद होणार आहे असा मॅसेज आला त्यावरुन फिर्यादीने मॅसेज मध्ये नमुद असलेल्या मोबाइल क्रमांकावर काॅल केला असता त्यांनी सांगितले कि सिमकार्ड ची केवायसी कराय ची आहे. आम्ही जे प्रोसिजर सांगतो तसे तुम्ही करा असे सांगुन फिर्यादीस प्लेस्टोर वरुन अँनीडेक्स नावा चा साॅफ्टवेयर डाउनलोड करायला लावुन तेथील ऑय काॅन वर त्याचे मोबाईलचे समोरील ४ आकडे ९४०४ असे टाकावयास लावले असता फिर्यादीचे खात्यातुन ९४०४ रुपये कपात झाले. फिर्यादीने परत आरोपीला काॅल करुन कपात झाल्याबद्दल विचारणा केली अस ता आरोपीने तुमचे पैसे परत येतील तुम्हाला मी सांगि तल्या प्रमाणे प्रोसिजर करावी लागेल असे बोलुन फिर्यादी कडुन परत तिच प्रोसेजर करुन घेऊन परत ९४०४ रुपये त्यांचे खात्यातुन कपात झाले असे एकुण १८,८०८ रुपयाने फिर्यादी निरज बागडे यांची आर्थिक फसवणुक झाली असल्याने सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन कन्हान येथे आरोपी विरुद्ध कलम ४२० अन्वये गुन्हा नोंद केला असुन आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात पोउपनि जावेद शेख हे करीत आहे.