Home अमरावती सामदा व सांगळूद प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीला तडे गेले, करोडो रुपये खर्च करुनही...

सामदा व सांगळूद प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीला तडे गेले, करोडो रुपये खर्च करुनही प्रकल्पावर माहितीचे फलक नाही, अधिकारी व ठेकेदाराचे साटेलोटे, पोहणाऱ्या युवकांचा जिव धोक्यात

220

दर्यापूर(उपजिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)
दर्यापूर तालुक्यातील सामदा व सांगळूद येथे जलसंपदा विभागामार्फत शेत शिवारामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरीत करुन प्रकल्पाची उभारणी केली आहे मात्र या प्रकल्पाचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून प्रकल्पात पाणी अडविण्यासाठी बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीलाच तडे गेल्याने पाण्याचे झरे वाहत आहेत
***सद्यस्थितीत या प्रकल्पात पाण्याची साठवण बऱ्यापैकी झाली असून येथे शौकीन युवक पोहण्यासाठी गर्दी करीत आहेत भविष्यात एखादा मोठा अपघात घडल्यास पोहणाऱ्या युवकांचा जिव धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून प्रशासनाने हि बाब गंभीरतेने घेतली पाहिजे
***शेतकऱ्यांची सिंचनाची सोय व्हावी या दृष्टिकोनातून शासनाने सामदा व सांगळूद या भागातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी हस्तांतरीत करून प्रकल्पाची उभारणी केली या प्रकल्पाचा गावाला नाहीतर दर्यापूरवरुन शेकडो युवक पोहण्यासाठी याचा उपयोग करीत आहेत
***आजच्या परिस्थितीत या प्रकल्पात पाण्याची साठवण मोठया प्रमाणात झालेली आहे संरक्षण भिंती उभारुन पाणी साठविण्यात आले परंतु या संरक्षण भिंतीला मोठया प्रमाणात तडे गेल्याने पाण्याचे झरे लागले आहेत त्यामुळे या संरक्षण भिंतीचे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याचा अंदाज येतो
भविष्यात पाण्याचा प्रवाह वाढल्यास एखादा मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण?येथे पोहणाऱ्या युवकांचा जिव धोक्यात येऊ शकतो करोडो रुपये खर्च करुनही या प्रकल्पावर माहिती कामसुचिचे फलकही नाही एकंदरीत या प्रकल्पाच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामात अधिकारी व ठेकेदार यांचे साटेलोटे असून याबाबतची सखोल चौकशी करुन अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे

Previous articleअखिल वारकरी संघ महाराष्ट्र राज्याच्या मराठवाडा विभागावर नामवंत किर्तनकारांची नियुक्ती. मराठवाड़ा विभाग अध्यक्ष पदी ह.भ.प.निरंजन भाईजी महाराज
Next articleकोरोनामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पहिला मृत्यू…… चंद्रपूर जिह्यातील बाधितांची संख्या 536……