आजवर निवेदने दिली यापुढे समस्यांच्या पुर्ततेसाठी जन आंदोलन उभारणारः समविचारी मंचचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर यांची घोषणा

0
36

 

प्रतिनिधी : निलेश आखाडे.

रत्नागिरीः जनसामान्यांच्या मनात खदखदत असलेले आणि ऐरणीवरील असंख्य विषय आम्ही महाराष्ट्र समविचारी मंचच्या माध्यमातून संबंधित शासकीय यंत्रणेला कळवत असून त्याला काही प्रमाणात यश येत आहे.त्यातील काही दुर्लक्षित विषयांवर लॉकडाऊन संपताच शांततामय मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचे समविचारीचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले,जिल्हा प्रशासनसह थेट मुख्यमंत्र्यांपर्यत ते संबंधित मंत्र्यांना ही निवेदन गेली आहेत.अनेक दुर्लक्षित पण गांभीर्य असलेले विषय आम्ही घेतले.
हे विषय सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत.राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी याकामी खरेतर लक्ष द्यायला हवे असे असतांना याप्रश्नी अक्षम्य दुर्लक्ष होते ही बाब जनतेने आणि समाजाभिमुख काम करणाऱ्यांनी दुर्लक्षित करण्यायोग्य नाही असेही पुनसकर यांनी स्पष्ट केले.
सर्वसामान्य नागरिक विषय सुचवतात आम्ही ते महाराष्ट्र समविचारी मंचाच्या वतीने त्या त्या शासकीय विभागासह जिल्हा प्रशासना पर्यत मांडतो.कित्येक विषय हे राज्य स्तरावरील असतात त्या विषयाचे महत्त्व ध्यानी घेऊन आम्ही मा.मुख्यमंत्र्यांना कळवतो.असे असतांना संबंधित शासकीय विभाग चालढकल करीत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत समविचारीच्या राज्यस्तरीय बैठकीत या प्रश्नावर लॉकडाऊन संपताच उपोषण,मोर्चे,निदर्शने आदी मार्गांचा अवलंब करण्याचे ठरविण्यात आल्याचेही पुनसकर यांनी सांगितले.
दरम्यान समविचारी संघटना राज्यभरात बळकट होत असून राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 28 जिल्ह्यात महिला जिल्हाध्यक्ष तर 32 जिल्ह्यात पुरुष जिल्हाध्यक्ष नेमण्यात आले आहेत.विशेष म्हणजे त्यातील 16 पदाधिकारी हे नामवंत वकील आहेत. हे सर्व जिल्हाध्यक्ष आपआपल्या विभागातील प्रश्न मांडत असून राज्यस्तरीय प्रश्नांवर एकत्र काम करीत असल्याने संघटनेच्या कामाला गती आली असल्याची माहिती पुनसकर यांनी दिली.
यापुढे विविध विषय मार्गस्थ होण्यासाठी सनदशील मार्गाने आंदोलन सुरु करणार असून याकामी समविचारीचे प्रमुख आणि माजी उपनगराध्यक्ष मा.बाबासाहेब ढोल्ये यांचे उत्तम मार्गदर्शन मिळत असल्याचे पुनसकर यांनी शेवटी सांगितले.

दखल न्यूज भारत