साईनाथ विद्यालयात गुणवंतांचा सत्कार

छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी
नुकत्यात लागलेल्या दहावीच्या निकालामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर पास झालेल्या विद्यार्थ्यांचा श्री साईनाथ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय मालेवाडा येथे सत्कार करण्यात आला.
यात प्रथम क्रमांक कु. रामेश्वरी राकेश नागोसे, द्वितीय क्रमांक श्रद्धा होमराज दखणे तर तृतीय क्रमांक सुशील हिरामण चांग हे गुणवंत उपस्थित होते.
प्राचार्य जीभकाटे सर यांच्याकडून प्रथम क्रमांकाचे बक्षीस २५१रुपये तर सर्व शिक्षकांकडून द्वितीय क्रमांकासाठी २०१ व तृतीय क्रमांकासाठी १५१ रुपये प्रदान करण्यात आले. पुढील वाटचालीसाठी गुणवंतांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.