पेट्रोल – डिझेल व गॅस सिलेंडर वरील महागाईच्या विरोधात वणीत काँग्रेसचे निषेध आंदोलन

0
22

 

वणी : परशुराम पोटे

पेट्रोल – डिझेल व गॅस सिलेंडर वरील महागाई कमी करण्याची मागणी काँग्रेसच्या वतीने दि.७ जुन २०२१ रोजी वणी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
भाजप केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल व गॅस सिलेंडरवर भरपूर प्रमाणात किंमती वाढवुन महागाई वाढविली. भाजप सरकारकडून पेट्रोल-डिझेल मधून कराच्या रुपाने लाखो कोटी रुपये नफा मिळवुन सामान्य जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटले आहे. केंद्र सरकारने इंधन जिवनावश्यक वस्तुच्या किंमती वाढवून सामान्य जनतेला वेठीस धरुन कंबरडे मोडले असे निवेदनात म्हटले आहे. करीत सामान्य जनतेच्या हितासाठी वणीतील लाठीवाला पेट्रोल पंप समोर काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारच्या महागाई विरोधात निषेध करण्यात आला व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, डॉ. मोरेश्वर पावडे, प्रा. टिकाराम कोंगरे, इजहार शेख, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रमोद निकुरे ,ओम ठाकूर, प्रमोद लोणारे, सुनिल वरारकर, हफीज रहेमान, रफीकभाई रंगरेज, अशोक नागभिडकर, सौ.संध्याताई बोबडे, प्रदिप खेकारे, अभिजीत सोनटक्के, विकेश पानघाटे, स्वप्नील सानेकर इ. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.