गणेशपुर येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

0
17

 

रोहन आदेवार
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

वणी : गणेशपुर येथे छत्रपती महोत्सव समिती तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
छत्रपती स्मारक गणेशपुर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून घोषणा देऊन साजरा केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश काकडे, समितीचे मार्गदर्शक सुभाष वैद्य व संदेश भोयर प्रमुख पाहुणे म्हणून होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश काकडे आणि प्रमुख पाहुणे सुभाष वैद्य यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन गजानन चंदावार व आभार प्रदर्शन विवेक ठाकरे यांनी केले.
यावेळी प्रशांत काळे, अक्षय राजूरकर , प्रशांत नागतुरे , वैभव ठाकरे, संतोष लांजेवार , गौरव काळे, विकास पेंदोर, शुभम भोंगळे, अनिकेत विरुटकर, हरीश घाटे,विशाल पेंदोर, निखिल येकरे, विकास चिडे, प्रवीण खानझोडे, राम मुडे, राजू घाटे, शुभम झाडे, सोहम गौरी, गौरव चीकराम, सौरभ कायंदे, निलेश बोढाले, आशिष बोबडे, ललित कायंदे, प्रणय इखारे, सागर बरशेट्टीवार, सोनू आत्राम व समितीचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते .