माजी मंत्री राजकुमार बडोले नेतृत्वात अर्जुनी मोर येथे दुधदरवाढ आंदोलन

195

 

प्रतिनिधी बिंबिसार शहारे
दखल न्युज भारत

अर्जुनी/मोर (गोंदिया) दि.०१/०८/२०२०:
भारतीय जनता पार्टी अर्जुनी मोर च्या वतीने माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वात राज्यव्यापी दूध दरवाढ महाएल्गार आंदोलन करण्यात आले.
गायीच्या दुधाला प्रतिलिटर दहा रुपये अनुदान, दूध भुकटीकरिता प्रतिकिलो ५० रुपये अनुदान, शासनाकडून ३० रुपये प्रतिलिटर दराने गायीच्या दुधाची खरेदी द्यावे तसेच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने राज्यात झालेल्या लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्यातील घरगुती वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. जास्त दराने वीजेची आकारणी झाल्याने सर्वसामान्यांची वीज बिले दुप्पट व तिप्पट आलेली आहेत. यामुळे सर्वसामान्य त्रस्त आहेत. या अन्यायकारक बिलांबाबत सरकारचा निषेध नोंदवुन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत विज बिलाची होळी करुन निषेध केला.

यावेळी तालुका अध्यक्ष अरविंद शिवणकर,महाराष्ट्र प्रदेश सदस्य रचना गहाणे,जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर,तालुका महामंत्री भोजु लोगडे,नुतन सोनवाणे,महीला मोर्चा तालुकाध्यक्ष मंजुषा तरोणे,केवळराम पुस्तोडे,उमाकांत ढेंगे,रामदास कोहाटकर,रघुनाथ लांजेवार,डाॅ.गजानन डोंगरवार,डॉ.नाजुकराव कुंभरे,चामेश्वर गहाणे,व्यकंट खोब्रागडे,डॉ.वामन ब्राम्हणकर,रामु केशरवानी,गिरीश बागडे,मुरलीधर ठाकरे,होमराज ठाकरे,रत्नाकर बोरकर,संदिप कापगते,विजय कापगते,रामलाल मुंगणकर,लैलेश शिवणकर,होमराज पुस्तोडे,रमेश मस्के,दिपंकर उके,पुरुषोत्तम डोये,प्राणगोपाल दास,गिता ब्राम्हणकर,मिना शहारे,सोनु क-हाडे,रचना वकेकार,अविनाश कापगते,गोपाल शेन्डे आदि उपस्थितीत होते.