भारतीय जनता पार्टी वणी तालुक्याच्या वतिने व आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात आज टिळक चौक वणी ,चिखलगाव,रासा येथे आंदोलन

177

 

वणी:-विशाल ठोबंरे

व मा. मुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य
यांना तहसीलदार साहेब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या संकटाच्या काळात सर्व जनतेला वाऱ्यावर सोडले आहे. जनतेला राज्य सरकारने कुठलीही ठोस मदत केलेली नाही. राज्यातील दूध उत्पादक शेतकरीही अडचणीत आलेला आहे. मा. देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या काळात दुधाला प्रति लिटर 5 रुपये अनुदान व दूध भुकटी निर्यातीला अनुदान दिल्या गेले, मात्र आपण ते सत्तेवर येताच बंद केले. शिवाय आतातर दुधाचे दर देखील खालावले आहेत. मात्र सरकारने या विषयाची दखल घेतली नाही. त्यामुळे नाईलाजाने आता रस्त्यावर उतरून आम्ही मागणी करतो की,
1)गाईच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर 10 रुपये अनुदान द्यावे !
2)दूध भूकटि निर्यातीला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावे!
3)दूध खरेदीचा दर प्रतिलिटर 30 रुपये करावे !
4)विद्युत दरवाढ कमी करावी !
कोरोना काळातील वीजबिल माफ करावे !
5)शेतकऱ्यांना युरिया मुबलक प्रमाणात देण्यात यावा.युरियाची कृत्रिम टंचाई दूर करावी
काळाबाजार करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करावी.
वरील सर्व मागण्या मान्य कराव्या व जनतेला होणारा त्रास कमी करावा यासाठी भारतीय जनता पक्ष आपल्याकडे मागणी करीत आहोत.
लवकरच मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातुन दिला आहे.यावेळी
श्री संजिवरेड्डी बोदकुरवार (आमदार, वणी विधानसभा),श्री तारेंद्र बोर्डे (नगराध्यक्ष,न.प.वणी व जिल्हाअध्यक्ष,भाजयुमो यवतमाळ),श्री दिनकरराव पावडे (महामंत्री, भाजपा यवतमाळ),श्री विजय पिदूरकर (उपाध्यक्ष, भाजपा यवतमाळ),श्री संजय पिंपलशेंडे (सभापती, प.स.वणी), श्री रवीजी बेलूरकर (माजी शहराध्यक्ष, वणी),श्री गजानन विधाते (तालुकाध्यक्ष, भाजपा वणी तालुका) श्री श्रीकांत पोटदुखे (उपाध्यक्ष न.प. वणी तथा शहाराध्यक्ष,भाजपा वणी शहर),श्री शंकर बादुरकर (उपाध्यक्ष, भाजपा वणी तालुका),श्री कैलाश पिपरराडे ,श्री दिपक पाऊनकर (संयोजक,सो.मी वणी तालुका),व सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.