आधार नसणाऱ्या वृद्ध शेतकऱ्यांना मिळणार का कर्जमुक्ती चा लाभ ? सरकार योग्य उपाय योजना करण्यास येणार का पुढे ?

119

 

दिपक दारोकार / तेल्हारा प्रतिनिधी – शासन शेतकर्‍यांकरिता विविध योजना राबविते परंतु हे योजना शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत का ? यातीलच एक महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आहे शेतकऱ्या प्रती खूप काही करणारे प्रभावशाली सरकार कोणत्या ही अटी व शर्ती शिवाय कर्जमुक्ती योजना आहे असे ठासून सांगणारे मंत्री याकडे लक्ष देतील का ?

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये अनेक वयोवृद्ध शेतकरी हे वंचित राहू शकतात करण वयाचा विचार करता असे काहि शेतकरी आहेत की ज्यांना खाटेवरून हलवता सुद्धा येत नाही एका जागी त्यांना सर्व सुविधा पुरवाव्या लागतात अशा शेतकऱ्यांना आधार कार्ड काढणे अशक्य आहे कारण वयाचा विचार करता त्यांचे बोटाचे ठसे उमटत नसल्याने व त्यांचे डोळे स्कॅन होत नसल्याने बऱ्याच वृद्धांचे आधार कार्ड निघत नाही आहे त्यांना अशा अडचणीचा सामना करावा लागत आहे

महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमध्ये आधार कार्ड नसल्याने हे वयोवृद्ध शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार का ? की या शेतकऱ्यांसाठी सरकार योग्य उपाय योजना करण्यास पुढे येणार का ? असा प्रश्न आता शेतकर्‍यांना पडला आहे शेवटच्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळायला पाहिजेत व अन्नदात्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन हे सरकार शेतकऱ्याचे सरकार आहे सांगणारे मंत्री योग्य उपाय योजना करण्यास पुढे येणार का ? असा शेतकऱ्यांचा सवाल आहे