महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात गडचिरोली येथे इंदिरा गांधी चौकात निदर्शने.

 

सदाशिव माकडे (प्रतिनिधी)
मो. 8275228020
(गडचिरोली जिल्हा)

महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेला दिलेला विजेचा धक्का दूर करून विजेचे ४ महिन्यांचे बिल माफ करावे व दुधाला प्रती लिटर 10/- रुपये अनुदान द्यावे अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली आहे.

आज राज्य सरकारच्या विरोधात गांधी चौक येथे आंदोलन करण्यात आले यावेळी शासनाच्या राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला व भाजपा काळात देण्यात येणारे अनुदान बंद करण्यात आल्याने सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सरकारने या मागण्या तातडीने मंजूर न केल्यास आणखी शासनाच्या विरोधात आंदोलन कडक करण्यात येतील असा इशाराही आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी आंदोलन प्रसंगी बोलताना दिला.

आंदोलनामध्ये निदर्शने करताना नगर परिषदेच्या नगराध्यक्षा योगिताताई पिपरे, भाजपा जिल्ह्याचे नेते गोविंदजी सारडा,
जिल्हा महामंत्री डॉ.भारत खटी, भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे , भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोदजी पिपरे , रमेशजी भूरसे, माजी शहराध्यक्ष सुधाकर येंनगंधलवार, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर अविनाश महाजन, संजयजी निखारे, शहर महामंत्री केशव निंबोड, विनोद देवोजवार, अनुसूचित जाती मोर्चाचे जनार्दन साखरे, नगरसेविका वैष्णवी नैताम, लता लाटकर, नगरसेवक प्रवीण वाघरे, भाजपा तालुका महिला आघाडी अध्यक्ष दुर्गाताई मंगर, आदिवासी नेते सागर कु, देवाजी लाटकर, नरेश हजारे, राजू शेरकी, राकेश राचमलवार भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.