लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना भाजपतर्फे अभिवादन भाजपतर्फे वीजबीलाची होळी

120

सचिन श्यामकुंवर तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत..।।
आमगाव, ता.01:येथील भाजप कार्यलयात भारतीय जनता पक्षाचे वतीने लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांची जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भाजपा जिल्हा अध्यक्ष केशवराव मानकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजप तालुकाअध्यक्ष काशीराम हुकरे, ॲड.इसूलाल उपराडे, नरेंद्र बाजपाई, राकेश शेंडे, नगर महामंत्री रघुनाथ भुते उपस्थित होते. यावेळी भाजप पदाधिका-यांनी लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन केले.
कार्यक्रमानंतर सर्व भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनाने लाॅकडाऊन काळातील वीजबील माफ करावे, दुग्ध उत्पादक शेतक-यांकडून दहा रूपये प्रति लिटर दराने शासनाने दुध खरेदी करावे,या मागणीसह गांधी चौकात वीजबीलाची सामुहिकपणे होळी केली…