युवा सरपंच नितीन वानखडे यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश.

0
87

 

तेल्हारा प्रतिनिधी :- ३१ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडी चे सर्वे सर्वा  प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थित यशवंत भवन अकोला येथे युवा सरपंच नितीन वानखडे (दापुरा, निंबोळी) यांनी पक्ष प्रवेश केला त्यामुळे वंचित ला मोठा फायदा होताना दिसत आहे नितीन वानखडे हे या अगोदर भारतीय जनता पार्टी मध्ये काम करत होते यांचा तालुक्यामध्ये दांडगा संपर्क आहे विशेषता तालुक्यातील अनेक युवक यांच्याशी जुडले आहेत समाज सेवेमध्ये सक्रिय आहेत सर्वांच्या सुखदुः सहभागी होणारे धडाडीचे सरपंच नितीन वानखडे यांचा *वंचित बहुजन आघाडी* मध्ये श्री. प्रदीप भाऊ वानखडे जिल्हाध्यक्ष ,श्री. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर , श्री. संजय हिवराळे( गट नेता पं स तेल्हारा) , ॲड.संतोष रहाटे, श्रीमती प्रतिभाताई भोजने ( अध्यक्ष जिल्हा परिषद ) समाजसेवक पराग दादा गवई , प्रा. प्रसन्नजीत गवई,  राजकुमार दामोदर, नितेश क्रीतक, हितेश जामनिक,पुरुषोत्तम अहिर, योगेश दारोकार, याच्या समक्ष जाहीर प्रवेश  केला.