वणी : परशुराम पोटे
अँसिड हल्ला करुन गायींना जखमी करणार्या विक्रुत प्रव्रुत्तीच्या लोकांचा शोध घेऊन ७ दिवसात कारवाई करा,अशा आशयाचे निवेदन भारतीय जनता युवा मोर्चाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा वणीचे नगराध्यक्ष तारेन्द्र बोर्डे यांनी आज दि.१ आँगष्ट ला उपविभागीय पोलीस अधिकारी वणी तथा ठाणेदार वैभव जाधव यांना दिले आहे.
सद्या काहि दिवसांपासुन वणी शहरात सातत्याने गोवंशावर अँसिड टाकल्याचे विक्रुत क्रुत्य काही समाज कंटकांकडुन केले जात आहे.यामध्ये आतापर्यंत जवळपास ७ ते ८ गोवंश जखमी झाले आहे.आजच्या स्थितीत वणी शहरातील जनमानसाच्या भावना दुखावल्या जात आहे.अशा विक्रुत प्रव्रुत्तीच्या लोकांना शासन होने गरजेचे आहे.त्यामुळे पोलीसांनी कठोर पाऊले उचलत या गुन्ह्यामध्ये सहभागी असलेल्यांचा ७ दिवसात शोध घेऊन कारवाई करा,अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल,असे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी तथा पोलीस स्टेशन वणी येथे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.यावेळी निलेश झाडे,अमोल पिंगे,निखील खाडे,गुंजन इंगोले उपस्थित होते.