टाकळी बु.परिसरात मुग पिकावर फिरविला ट्रॅक्टर शेतकरी संकटात टाकळी बु.परिसरात मुगावर अज्ञात रोगाचे आक्रमण

126

 

अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

सध्या मुगाचे पीक शेतात बहरले असुन पिकाला फुलधारणा झाली आहे माञ यंदा मुगाच्या पिकावर अज्ञात रोगाचे आक्रमण झाले असुन शेतकरी संकटात सापडला आहे.टाकळी बु. येथील शेतकय्रांने ४ एकर शेतात मुगाच्या पिकाची पेरणी केली मुगाला फुलधारणा झाली. माञ मुग पिकाचा फुलोरा खाली पडत असुन पिक सुकत चालल्याने पिकावर ट्रॅक्टर फिरविला टाकळी बु. येथील शेतकरी योगेश म्हैसने यांनी ४ एकर शेतात मुगाची पेरणी केली पेरणीनंतर प्ररिश्रमाच्या जोरावर पीक फुलविले अचानक हिरवेगार असलेल्या मुग पिकावर अज्ञात रोगाने थैमान घातले त्यामुळे मुगाचे पीक सुकत चालले आहे. जवळपास ३५ ते ४५ दिवसांपासुन पिकाला जपत असल्याने शेतकय्रांने अखेर मुगाच्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला खारपाणपट्टयात येत असलेल्या टाकळी बु. हनवाडी, नादखेड, पिलकवाडी ,नखेगाव, पारळा ,सालखेड, आगासखेड, लाजरवाडी, टाकळी खुर्द या परिसरात मुगाचा पेरा यंदा बय्रापैकी आहे. शेतकय्रांनी बी बियाणे खते त्यानंतर पेरणीसाठी खर्च आला मुगावर रोग आल्याने महागड्या ओषधांची फवारणीसुध्दा केली. तरीही पीक सुकत चालल्याने शेतकय्रांने मुग पिकावर ट्रॅक्टर फिरविण्याचा निर्णय घेतल्याचे म्हणणे आहे .

चौकट

शेतकय्रांना तत्काळ मदत देण्याची मागणी ::मुगावर अज्ञात रोगाचे आक्रमण झाल्याने ट्रॅक्टर फिरविण्याची वेळ आली आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असुन संकट काळात सर्व्हे करून शेतकय्रांना तत्काळ मदत करण्याची मागणी होत आहे.चार एकर फुलोय्रावर आलेल्या मुग पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पीक सुकत चालले आहे लागवडीचा खर्चही वसुल होणार नसल्याने मुगाच्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला :::

शेतकरी
योगेश म्हैसने टाकळी बु.