बसपा अध्यक्ष मायावती यांच्यावर टीका करणाऱ्या रणदीप हुडा अ‍ॅट्रॉसिटी नुसार कारवाई करावी :जयदीप जोगेंद्र कवाडे यांची मागणी

143

प्रतिनिधी रजत डेकाटे

बहुजन समाज पक्षाच्याअध्यक्षा व उत्तर प्रदेश च्या माजी मुख्यमंत्री बहन मायावती यांच्यावर हिन अशी टीका केल्याबद्दल अभिनेते रणदीप हुडा यांचा तिव्र निषेध पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी केला असून या प्रकरणी रणदीप हुडा वर अ‍ॅट्रॉसिटी अॅट नुसार कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. दलित, बहुजन समाजाच्या बहन मायावती यांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही. अभिनेते रणदीप हुडा फिल्म इंडस्ट्री वर कलंक असून जातीयवाद व अस्मितेतून महिला वर्गाला आव्हान करणारे व्यक्तव करून रणदीप हुडा यांची माणसिकता हिन असुन जातीय व्देशाची आहे. त्यांच्यावर फिल्म इंडस्ट्रीने बंदी घातली पाहिजे. यांचा कोणताही चित्रपट महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात चालु देणार नाही त्याच प्रमाणे अ‍ॅट्रॉसिटी नुसार कारवाई करुन तुरुंगात डांबले पाहिजे. अशी संतप्त प्रतिक्रिया पिपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केली आहे.