धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन नाचोना खुर्माबाद गट ग्रामपंचायत सरपंच ,सचिव वर कारवाई करा

0
110

 

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे):-
दर्यापूर तालुक्यातील खुर्माबाद ग्रामपंचायत ने अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी न केल्याने सरपंच ,सचिव याचे वर कारवाई करावी समस्त धनगर समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन अन्यथा सर्व धनगर समाज आंदोलन करणार समस्त धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहे शासनाच्या आदेशानुसार सर्व थोर महापुरुष याच्या जयंती पुण्यतिथी साजरी सर्व शासकीय ,निमशासकीय कार्यालयात साजरी करण्यात आली पाहिजे मात्र नाचोना
खुर्माबाद ग्रामपंचायत कार्यालयात अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी केली नाही त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले या वेळी सर्व समाज बांधव शरद भाऊ नवलकार महादेवभाऊ खराटे
गजानन भाऊ नवलकार,दत्ताभाऊ नवलकार ,प्रमोद खराटे, अशोकभाऊ नवलकार संतोष नवलकार ,संदीप खराटे, प्रदीप खराटे, प्रकाश काळदाते, विनायक खराटे, गणेशराव खराटे,रोशन खराटे सर्व धनगर समाजा मध्ये नाराजीचा सुरू दिसत आहे ग्रामपंचायत भेदभाव करत असल्याची ओरड समाजात दिसत आहे

प्रतिक्रिया

शासनाच्या GR प्रमाणे सर्व महापुरुष यांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करावी असे आदेश असतांना सुद्धा नाचोना खुर्माबाद गट ग्रामपंचायत आदेशाला मानत नसेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ग्रामपंचायत भेदभाव करत आहे असे मला वाटते कारवाई केली नाही तर राजमाता अहिल्याब्रिगेडच्या वतीने आंदोलन करणार व समस्त धनगर समाज या मध्ये सहभागी होणार धनगर समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहे आमचे आराध्य दैवत राजमाता अहिल्यादेवी होळकर याचा हा अपमान सहन केला जाणार नाही

श्री शरदभाऊ नवलकार
अध्यक्ष दर्यापूर तालुका
राजमाता अहिल्या ब्रिगेड महाराष्ट्र राज्य