भा ज पा कुरखेडा चे वतिने महविकास आघाडी सरकार च्या विरोधात “महाएल्गार आन्दोलन”

146

कुरखेडा/राकेश चव्हान प्र
भारतीय जनता पार्टी कुरखेडा यांच्यावतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात “महाएल्गार आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होवून नागरिकांनी महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.
मागील ४ महिन्यांची वीजबिल माफी व दूध उत्पादकांना प्रती लिटर १० रुपये अनुदान देण्याची मागणीचे घोषणा देण्यात आले.
भाजपा कार्यालय कुरखेडा समोर नगराध्यक्ष तथा शहर अध्यक्ष रविंद्र गोठेफोडे यांच्या नेतृत्वाखाली घोषणा देण्यात आले.
मागील ४ महिन्यांचे वीजबिल माफ करावे व दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर १० रुपये सबसिडी देण्यात यावी या प्रमुख मागणी करिता १ ऑगस्ट ला आज दु १ वा. महाएल्गार आंदोलन सुरू केले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून प्रत्येक गोष्टींमध्ये जनतेला वेठीस धरण्याचे काम हे सरकार करीत आहे . अगोदरच आर्थिक अडचणीत असणाऱ्या सामान्य माणसाला कोणताही आधार न देता उलट विजेचे ४ पट बिल देऊन मोठा धक्का दिला आहे.तसेच दूध उत्पादकांना भाजपा सरकारच्या काळात देण्यात येणारी प्रती लिटर ५ रु सबसिडी बंद करून राज्यातील जनतेवर राज्यातील शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या महाविकास आघाडीच्या सरकारने मोठा आघात केला आहे. सरकारने तातडीने मागील ४ महिन्यांचे वीजबिल माफ करावे व दूध उत्पादकांना प्रती लिटर १० रुपये सबसिडी द्यावी, दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर देण्यात यावा , कुरखेडा तालुका कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी घेवून महाविकास आघाडी सरकार च्या विरोधात “महाएल्गार आंदोलन” करण्यात आले . या आंदोलनामध्ये माजी भाजपा तालुकाध्यक्ष रामभाऊ वैद्य, स्वच्छता व आरोग्य सभापती नागेश्वर फाये, महिला तालुकाध्यक्ष जयश्री मडावी, नगरसेविका शाहेदाताई मुगल ,दीपाली ताई देशमुख, स्वीकृत नगरसेवक रामभाऊ उगले, मनीष शर्मा, भाजयुमो तालुकाध्यक्ष विनोद नागपूरकर, उपाध्यक्ष तुषार कुथे, शहर अध्यक्ष युवा मोर्चा अतुल झोडे , महामंत्री चरण रासेकर , भाजयुमो सदस्य स्वप्निल खोब्रागडे, ईश्वर बनसोड, बंटी देवढगले, नानाजी बावने. पदाधिकारी व कार्यकर्तेउपस्थित होते.