महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातील “महाएल्गार आंदोलन मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती महाविकास आघाडी सरकारचा निषेध असो ! भाजपा तालुकाध्यक्ष नसरूदीन भामानी.

0
123

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

कोरची दि 1 अगस्ट
मागील ४ महिन्यांचे वीजबिल माफ करावे व दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर १० रुपये सबसिडी देण्यात यावी या प्रमुख मागणी करिता महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात कोरची नगर पंचायत क्षेत्रात आज दिनांक १ ऑगस्टला ठिक 2, वाजता महाएल्गार आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात नसरूदीन भामानी व कार्यकर्त्यांनी महविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषनाबाजी करुन निषेध केला. कोरची चौकात बिलाची होळी, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून प्रत्येक गोष्टींमध्ये जनतेला वेठीस धरण्याचे काम हे सरकार करीत आहे . अगोदरच आर्थिक अडचणीत असणाऱ्या सामान्य माणसाला कोणताही आधार न देता उलट विजेचे ४ पट बिल देऊन मोठा धक्का दिला आहे.तसेच दूध उत्पादकांना भाजपा सरकारच्या काळात देण्यात येणारी प्रती लिटर ५ रु सबसिडी बंद करून राज्यातील जनतेवर राज्यातील शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या महाविकास आघाडीच्या सरकारने मोठा आघात केला आहे.कोरोणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकार सामान्य जनतेच्या भावनांशी खेळत असल्याने व सर्वच कामात अपयशी ठरलेल्या या सरकारने आता जनतेच्या विरोधात निर्णय दिल्यास त्याचे गंभीर परिणाम या सरकारला भोगावे लागतील असा इशाराही नरूदीन भामानी यांनी सरकारला दिलेला आहे . सरकारने तातडीने मागील ४ महिन्यांचे वीजबिल माफ करावे व दूध उत्पादकांना प्रती लिटर १० रुपये सबसिडी द्यावी, दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर देण्यात यावा ,दूध भुकटीच्या निर्यातीला प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्यात यावे. अशी मागणी घेवून महाविकास आघाडी सरकार च्या विरोधात “महाएल्गार आंदोलन” करण्यात येत असल्याची माहिती नगरसेवक तथा भाजपा तालुकाध्यक्ष नसरुदीन भामानी यांनी दिली आहे. या आंदोलनामध्ये डॉ शैलेंद्र बिसेन, आनंद चौबे, देवराव गजभिये, मधुकर नखाते, मनोज टेभुणेँ, अनिल वाढई, विलास अंबादे, नैताम कौशिक, नगरसेविका निर्मल मोहुलेँ, नगरसेविका केसरबाई अंबादे, नसीम पठाण, प्रकाश कौशिक, नंदू पंजवानी, अरूण नायक, इतर कार्यकर्ते आदी उपस्थि होते तसेच बेतकाठी व बेडगाव भारतीय जनता पार्टी शाखा च्या वतीने सदाराम नुरूटी पंचायत समिती सदस्य याच्या नेतृत्वाखाली मुख्य चौकात बिलाची केली.” होळी” व बिल माफ करण्याची मागणी केली. भाजप कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित होते .