भंडारा (०१ ऑगस्ट २०२०):- भारतीय जनता पक्षातर्फे आज महाराष्ट्र शासनाच्या विरोधात राज्यभर महाएल्गार आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान प्रत्येक तालुका स्तरावरील दूध संकलन केंद्र बंद पाडून राज्य शासनाचा निषेध करण्यात आला.

0
105

 

ऋग्वेद येवले
तालुका प्रतिनिधि

आमदार डॉ परिणय फुके यांनी सांगितले की, गायीच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर १० रुपये अनुदान, दूध भुकटी निर्यातीला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान, शेतकऱ्याच्या दूध खरेदीचा दर प्रतिलिटर ३० रुपये करावा अशी मागणी आंदोलन दरम्यान केली. तसेच कोरोना चा काळात वीज बिल भरमसाठ वाडल्याने सामान्य माणूस आर्थिक संकटात सापडलेल्या आहे. त्यामुळे वीज बील माफ करण्यात यावे. प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिकेत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्या गेले. यावेळेस राज्य सरकार विरोधात नारेबाजी करत राज्य सरकारने मागणी तात्काळ मान्य करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी खासदार सुनीलभाऊ मेंढे, भंडारा जिल्हाध्यक्ष श्री प्रदीप पडोळे, माजी खासदार सिशुपालजी पटले, मुन्नाजी पुन्डे जिल्हामहामंत्री भाजपा,हेमंतजी देशमुख, चैतन्य उमाळकर, विलासजी काटेखाये,रामकुमार गजभिये, नीतिनजी करेमोरे, प्रशांतजी खोब्रागडे, संजय कुंभलकर, नीलकंठ कायते, चन्द्रप्रकास दुरुगकर, के.के.पंचबुद्धे, डॉ. दिलीप फटिंग,निशिकांत इलमे, राजेश वाघमारे, विनोदजी बांते, संतोष त्रिवेदी,भूपेश तलमले , रोशन काटेखाये,अमोल सहारे, किशोर ठाकरे, अमित बिसने, बबलुजी आतिलकर, शुभम चौधरी, अजय ब्राम्हणकर, येशवंत मने,शैलेश मेश्राम, कल्याणी भूरे,साधना त्रिवेदी, युगकांता रहांगडाले,प्रीती गोसेवाडे, झाशी गभने, प्रीती जांभुलकर, शिल्पा बावनकुळे, कुंदा वैद्य, व इतर.