शिवसेना व युवासेना तर्फे मारेगाव येथे पार पडले भव्य रक्तदान शिबिर

178

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

मारेगाव:महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब तसेच शिवसेनेचे तालुका प्रमुख मा.गजानन भाऊ किन्हेकार यांच्या वाढदिवसानिमित्त मारेगाव येथील नगरपंचायत मध्ये रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मा. विधानसभा संघटक शिवसेना सुनील भाऊ कातकडे, संजय निखाडे उपजिल्हा प्रमुख शिवसेना, विशेष अतिथी दीपक भाऊ कोकास, गणपत लेडांगे माजी तालुका प्रमुख वणी शिवसेना, राजू तुराणकार शहर प्रमुख शिवसेना, अजिंक्य शेंडे, राजूभाऊ मांदाळे गुरुदेव प्रसारक, विजय भाऊ मेश्राम माजी शहर प्रमुख शिवसेना मारेगाव, अनिल राऊत, सचिन पचारे, विशाल किन्हेकार, पवन जांभुळकर, राजू गौरकर, भास्कर वेले, योगेश मेश्राम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

*शिवसैनिक व हितचिंतकांना केले होते आवाहन*
२७ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता. मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. त्यामुळं आपल्या नेत्याचा हा वाढदिवस शिवसैनिकांसाठी निश्चितच मोठा आहे. दरवर्षी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशी शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक व हितचिंतकांची ‘मातोश्री’ निवासस्थानी रीघ लागते. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा करणार नाही. त्यामुळं कुणीही कार्यालयात किंवा निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह धरू नये. तसंच, हारतुऱ्यांऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सढळ हस्ते देणगी द्यावी. नियम पाळून आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत. कुठेही जाहिरात फलक, भित्तीपत्रके लावू नयेत किंवा गर्दी करण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन त्यांनी शिवसैनिक व हितचिंतकांना केले होते.