सरपंच व उपसरपंच 1,10,000 रु.ची लाच स्वीकारताना ACB च्या जाळ्यात

0
1781

 

ऋषी सहारे
संपादक

गडचिरोली दि 31 मे:-
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील नेताजीनगर येथील सरपंच व उपसरपंच यांनी स्वीकारली लाच.
तक्रारदार पुरुष, वय 50 वर्षे, रा.नेताजीनगर पो.भाडभिडी ता.चामोर्शी जि.गडचिरोली
यांचे तक्रारीवरून
आरोपी 1) गोपाल नगेन राॅय, वय 52 वर्षे, सरपंच , ग्रामपंचायत नेताजीनगर, ता.चामोर्शी जि.गडचिरोली
2) संजीत कांचन भट्टाचार्य, वय 35 वर्षे, उपसरपंच , ग्रामपंचायत नेताजीनगर, ता.चामोर्शी जि.गडचिरोली,
दि. 09/05/2021
तक्रारीस ग्रामपंचायत नेताजीनगर मार्फतीने मौजा नेताजीनगर येथे केलेल्या नाली बांधकाम, सिमेंट काँक्रीट रस्ता व सिंचन बंधारा कामाचे मंजुर बिल रुपये 22,00,000/- चे चेकवर स्वाक्षरी करण्याचे कामाकरीता नमुद दोन्ही आरोपींनी रुपये 2,20,000/- लाच रक्कमेची मागणी करुन तडजोडीअंती रुपये 1,10,000/- लाच रक्कमेची पंचसाक्षीदारासमक्ष सुस्पष्ट मागणी केली. आपले लोकसेवक पदाचा दुरुपयोग करुन स्वत:चे आर्थिक फायद्याकरीता वाम भ्रष्ट मार्गाने रुपये 1,10,000/- लाच रक्कम स्विकारल्याने आरोपीतांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.
पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, मिलींद तोतरे, अप्पर पोलीस अधिक्षक, परिक्षेत्र नागपूर. यांचे मार्गदर्शनात
सापळा कारवाई पथक :- पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड, पो.हवा नथ्थु धोटे, पो.ना. सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, पो.शि. महेश कुकुडकार, चा.पो.शि. घनश्याम वडेट्टीवार सर्व ला.प्र.वि. गडचिरोली.
हैश वैल्यू घेण्यात आली आहे.