बहुजन विद्यार्थी संघटना मुरबाड तालुका अध्यक्ष पदी पत्रकार सुभाष जाधव यांची निवड!

121

मुरबाड , दि,१,बहुजन विद्यार्थी संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांसाठी काम करीत आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवितअसून या संघटनेने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे पत्रकारितेचा अनुभव असणारे , विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीसाठी धावून जाणारे एक हरहुन्नरी पत्रकार सुभाष जाधव यांची मुरबाड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आले आहे मुरबाड तालुक्याचे जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील या प्रश्नांना आळा घालण्यासाठी सुभाष जाधव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे
यामुळे मुरबाड तालुक्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
त्यांच्यावर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बहुजन विद्यार्थी संघटना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य अनिल वाणी साहेब, ठाणे जिल्हा अध्यक्ष नितीन तांबे साहेब त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मुरबाड तालुक्यात सर्वच ठिकाणी अभिनंदन होत आहे.