जंगली जनावरांचा हौदोस.. शेतकऱ्यांचे केळी पिक उध्वस्त वन विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी…

0
111

 

.अकोट शहर प्रतिनिधी
स्वप्नील सरकटे

अकोट तालुक्यातील वाई शेतशिवारात गावा लगत असलेल्या सुरेश कराळे यांच्या शेतात केळीची लागवड एक महिन्या अगोदर करण्यात आली होती.
दि.३१जुलैच्या मध्यरात्री जगंली डूकाराच्या कळपानी अंदाजे ५०० केळीचे रोपटे पुर्णपणे ऊध्वस्त केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असुन अकोला उपविभाग अकोट वनविभागाकडे नुकसान भरपाईची मागणी करून जगंली जनावराचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होतांना दिसत आहे.