Home Breaking News धाबा येथे वीज बिलाची होळी विदर्भराज्य आंदोलन समितीचा पुढाकार

धाबा येथे वीज बिलाची होळी विदर्भराज्य आंदोलन समितीचा पुढाकार

140

 

प्रसेनजीत डोंगरे,
तालुका प्रतिनिधी गोंडपिपरी,
8275290099,
गोंडपिपरी. लाकडाऊनच्या काळातील तीन महिन्याचे वीज बिल माफ करण्यात यावे,आणि पुढील दोनशे युनिट पर्यंत वीज मोफत देण्यात यावी यासह अन्य मागण्यांना घेऊन गोंडपीपरीतील विदर्भवादी आक्रमक झाले. तालुक्यातील धाबा येथे विदर्भराज्य आंदोलन समिती च्या वतीने वीजबिलची होळी करण्यात आली. व तीन महिन्याचे वीज बिल माफ करावे, अशा मागणीचे निवेदन धाबा येथील कनिष्ठ अभियंता यांना देण्यात आले.
या आंदोलनात वीज बिल माफीसह यापुढे 200 युनिट पर्यंत वीज मोफत देण्यात यावी, विजेचा उत्पादन खर्च केवळ 2.50 रु. असताना घरगुती ग्राहकांना सरासरी 7.50 रु. प्रती युनिट व व्यावसायिक, औद्योगिक वापराला आकारले जाणारे 11.50 रु. प्रती युनिट हे दर तातडीने निम्मे करण्यात यावे, विदर्भात गेल्या तीन वर्षात सततची दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेती पंपाचे थकीत वीज बिल कायमचे संपवण्यात यावे,विदर्भात शेतकऱ्यांना पूर्ण वेळ पूर्ण दाबाची वीज देण्यात यावी व मागेल त्याला वीज कनेक्शन देण्यात यावे व लोडशेडिंग कायमची संपवण्यात यावी.आदी मागण्यांना घेऊन विदर्भवादी आक्रमक झाले होते.याप्रसंगी तालुक्यातील शेकडो शेतकर्यांनी आंदोलनाला प्रतिसाद देत वाढीव आलेले वीजबिल वीज वितरण कार्यालयासमोर जाळले.सोबत नारेबाजी करून निषेध केला.व तीन महिन्याचे वीज बिल पूर्ण माफ करण्याची एकमुखी मागणी केली. आंदोलनाचे नैतृत्व माजी आमदार वामनराव चटप यांनी केले.यावेळी समितीचे तालुका अध्यक्ष अरुण वासलवार,तुकेश वानोडे,डाँ. संजय लोहे, आनंद खर्डीकर, सूर्यकांत मुंजेकर, श्रीराम काळे, मधुकर चिंचोलकर, शाम रामगिरकर, गुणवंत वाढई, पांडुरंग भोयर, ॲड. प्रफुल आस्वले, राजकुमार पिंपळशेंडे यांचेसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Previous articleभारतीय जनता पार्टी सोनीच्या वतीने विज बिलांची होळी तसेच तिघाडी सरकारचा विरोध आंदोलन आज गांधी चौक सोनी येथे करण्यात आला
Next articleजवाहरलाल नेहरू विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय याकडून गृहभेटी द्वारा गुणवंतांचा सत्कार