Home चंद्रपूर  सावलीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण व छोट्या व्ययवसायिक, कोविडमध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबांना पालकमंत्री वडेट्टीवार...

सावलीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण व छोट्या व्ययवसायिक, कोविडमध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबांना पालकमंत्री वडेट्टीवार कडून आर्थिक मदत

140

सुधाकर दुधे
सावली – कोरोना रुग्ण व इतर रुग्णांना उपचारार्थ रेफर करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून लोकार्पण करण्यात आले व छोटे ठेलेधारक, वाजंत्री, सलूनवाले व कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना आर्थिक मदत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडून करण्यात आली.
तालुक्यात रुग्णांना दवाखान्यात भरती करण्याकरिता वेळेवर वाहन उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणी येत होते. कोविड रुग्णांसाठी स्वखर्चातून 4 रुग्णवाहिका पालकमंत्री वडेट्टीवार यांनी लावले आहे. तालुक्यातील रुग्णांना कायमस्वरूपी सोय होण्याचे दृष्टीतून स्थानिक विकास निधीमधून नगरपंचायतीला पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी रुग्णवाहिका दिली. त्याचे लोकार्पण करण्यात आले तसेच कोविडच्या प्रादुर्भावामुळे रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाने राज्यात लॉकडॉउन लागू केला. त्यामुळे तालुक्यातील कष्टकरी व छोटे काम करून उपजीविका करणारे सलूनवाले, चहा टपरीवाले, वाजंत्री, चपल दुरुस्त करणारे मोची, लोहार, सुतार यांच्यासह कष्टकरी काम करणाऱ्या परिवाराना प्रत्येकी एक हजार रुपये आर्थिक मदत विजय वडेट्टीवार यांनी केले. तालुक्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या आर्थिक परिस्थिती कमजोर असलेल्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे हस्ते केली.
याप्रसंगी जेष्ट नेते संदीप गडमवार, खनिज विकास सदस्य दिनेश चिटनुरवार , पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, काँग्रेस तालुका अध्यक्ष यशवन्त बोरकुटे, शहर अध्यक्ष नितीन दुवावार, संदीप पुण्यपवार, उपस्थित होते.

Previous articleवडूरा येथे खरीप मान्सुम सभेचे आयोजन
Next articleमहा”वसुली” सरकारने मराठा समाजाचा घात केला- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची घणाघाती टीका