Home अमरावती वडूरा येथे खरीप मान्सुम सभेचे आयोजन

वडूरा येथे खरीप मान्सुम सभेचे आयोजन

86

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे):-दर्यापूर तालुक्यातील खल्लार नजिकच्या वडुरा येथे मान्सुमपुर्व सभेचे आयोजन करण्यात आले होते
हि सभा दर्यापूर तालुका कृषी अधिकारी श्री आर. टी. अडगोकर यांचे मार्गदर्शनाखाली कोविड१९ चे नियमांचे पालन करूनसभेचे आयोजन करण्यात आली. सभे दरम्यान शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादकता वाढीसाठी यशस्वी पेरणी चे अष्टसूत्री बाबत माहिती श्री विशाल देशमुख यांनी बियाणे उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिकं द्वारे दिली, बीजप्रक्रिया करणे, दहा वर्षे आतील वान निवडणे जसे JS ९५६०, MAUS ७१, MAUS१५८ , पेरणी १०० मिली पाऊस पडल्याशिवाय करू नये, बियाण्या चे योग्य प्रमाण राखावे, पेरणी बिबियेफ यांत्रा द्वारे करावी ह्यामुळे बियाणे कमी प्रमाणात लागते तसेच मुलस्थानी जलसंधारण होते, अथवा पट्टापेर करावी ह्यामुळे सरी काढता येते फुलावस्थेत फवारणी आणि इतर कामे करण्यास मदत होते, पेरणी ३-५ सेमी पेक्षा जास्त खोल करू नये. तसेच अनावश्यक रासायनिक खत वापर टाळावा, जमीन सुपीकता निर्देशांक फलक त्या आधारे करावा. बियाण्यास प्रक्रिया जैविक खतांचा वापर करावा. सेंद्रिय खते, शेणखत, गांडूळखत वापर करावा. खते जमिनीवर टाकल्यावर ती त्वरित मतीआड करावी. पीक अवस्थेनुसार खताची मात्रा द्यावी. पिकांची फेपालट करावी, फुलं अवस्थेत २% युरिया फवारणी करता येते, तसेच विद्राव्य खते ठिबक द्वारे देता येतात. तसेच श्री जी. ओ. कळसकर मंडळ कृषी अधिकारी यांनी माग्रारोह्यो अंतर्गत फळबाग, पोकरा प्रकल्प बाबत माहिती दिली तसेच डिजीटल शेतीशाळा नोंदणी करणे, निंबोळी अर्क तयार करणे, बांधावर बी आणि बियाणे उपब्धता. माहिती दिली सदर सभेस श्री निलेश उंबरकर, विविध कार्य. सह. संस्था अध्यक्ष, श्री मंगेश उंबरकर ग्रा. पंचायत सदस्य, श्री गौरव सगने , श्री अतुल पेढेकर इतर शेतकरी उपस्थित होते.

Previous articleकोंढाळा-शिवराजपुर व इतर परिसरातून अवैधरित्या मुरुमाची वाहतूक – महसूल विभागाचे दुर्लक्ष,लाखोंचा महसूल बुडाला
Next articleसावलीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण व छोट्या व्ययवसायिक, कोविडमध्ये मृत्यू झालेल्या कुटुंबांना पालकमंत्री वडेट्टीवार कडून आर्थिक मदत