लोकमान्य टिळक महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागातर्फे ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा समारोप लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी तर्फे नेहमीच विविध उपक्रम राबविले जातात

0
269

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

वणी: 1 जुलै ते 30 जुलै एक महिन्याच्या समाजशास्त्र विभागातर्फे ऑनलाईन कोर्स घेण्यात आला. डॉ. निलिमा दवणे यांचा सामाजिक समस्येविषयी जाणीव जागृती हा प्रमाणपत्र कोर्स होता. या मध्ये 254 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. आणि सामाजिक परिवर्तनात सामाजिक घटनांची भूमिका हा प्रा. किशन घोगरे सरांचा कोर्स होता. या मध्ये 85 विद्यार्थी सहभागी होते. या दोन्ही कोर्स मध्ये भ्रष्टाचार, दहशतवाद, कौटुंबिक हिंसाचार, हुंडा, घटस्फोट, स्त्रिया विरुद्ध चे अत्याचार, धार्मिक असहिष्णुता, पांढरपेशीय गुन्हे, बालगुन्हेगारी अश्या अनेक समस्यांना घेऊन हा कोर्स होता. विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. या वेळी प्राचार्य. डॉ. प्रसाद खानझोडे यांनी या विद्यार्थ्यांचे अध्ययन आणि अध्यापन ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पुर्ण झाली. असे मनोगत व्यक्त करून सर्टिफिकेट कोर्सचे कौतुक केले. विद्यार्थी फक्त शिकलेच नाही तर त्याचा अनुभव आत्मसात केला. या कोरोना काळामध्ये सुद्धा शैक्षणिक प्रक्रिया न थांबवता असे ऑनलाईन कोर्स लोकमान्य टिळक महाविद्यालया तर्फे घेण्यात आले. लोकमान्य टिळक महाविद्यालया तर्फे नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. काही दिवसांपूर्वी टिव्ही च्या माध्यमातून बारावी च्या विद्यार्थ्यांना शिक्षण सुरू केले. तर आता ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम कोर्स पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डॉ. प्रसाद खानझोडे लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी भूषवले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. नीलिमा दवणे समाजशास्त्र विभाग प्रमुख यांनी केले. या कार्यक्रमात दुर्गेश मडावी, पूजा डाखोरे, शुभकांत पानघाटे व स्नेहा मेश्राम विद्यार्थ्यांनी कोर्स बद्दलचे मनोगत व्यक्त केले. प्रा. किशन घोगरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार मानले. शिक्षण प्रसारक मंडळ व लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभागातर्फे आभार मानले गेले.