Home चंद्रपूर  पालकमंत्री ना.विजय वडेटटीवार यांनी घेतले देवटोक येथे उत्खनात निघालेल्या शिवपिंडी चे दर्शन...

पालकमंत्री ना.विजय वडेटटीवार यांनी घेतले देवटोक येथे उत्खनात निघालेल्या शिवपिंडी चे दर्शन रसत्यासाठी खनिज निधितुन 60 लाख देत असल्याची घोषणा

210

 

सावली ( सुधाकर दुधे )

देवटोक येथे उत्खनांत मिळालेले शिवपिंडी ही पुरातन असून हे क्षेत्र धार्मिक तीर्थस्थळ व पर्यटन स्थळ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी येण्यासाठी रसत्याला खनिज विकास निधितुन 60 लक्ष देत असल्याची घोषणा करित शिवपिंडी दर्शन घेवून आनंद झाला असून पुढेहि येथे येत राहणार असे पालकमंत्री ना. विजय वडेटटीवार यांनी भेटि दरम्यान म्हटले.

सावली तालुक्यातील वैनगंगा नदीच्या उत्तर वहिनीच्या काठावर असलेल्या देवटोक येथे दिनांक 25 ला सायंकाळी 6 च्या दरम्यान नवीन मंदिर बांधकाम करण्यासाठी कॉलम चे जेसीपी च्या खोदकाम करीत असतानाच जवळपास अंदाजे 5 फूट लांबी व 1 फूट उंच ची पुरातन शिवपिंडी आढळून आली. त्या शिव पिंडी ची विधीवत पूजा करण्यात आली.शेकडो लोकांनी ही शिवपिंडी पाहण्यासाठी गर्दी करित आहे. आज दिनांक 28 ला दुपार 4 च्या सुमारास राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री, चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेटटीवार यांनी देवटोक येथे भेट देत पाहणी केली व पूजा अर्चना केली.तसेच या क्षेत्राचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.वैनगंगा नदी काठावरिल हे पावन स्थळ असून मार्कण्डेय ऋषि यांचे वडील श्री मुरकेन्डेश्वर ऋषि यांचे स्थान आहे.यासाठी भरपूर निधि उपलब्ध करुण देवू असे ना.विजय वडेटटीवार यांनी या प्रसंगी म्हटले. पालकमंत्री ना. वडेटटीवार त्यांच्या समवेत कांग्रेस जेष्ठ नेते संदीप गड्डमवार, खनिज महामंडळ सदस्य दिनेश चिटनुरवार, पंचायत समिती सभापती विजय कोरेवार ,कांग्रेस अध्यक्ष बंडू बोरकुटे, युवा अध्यक्ष नितिन दुव्वावार,राजू सिद्धम,श्री पुण्यभूमी तीर्थक्षेत्र मुरकुंडेश्वर देवस्थान ट्रस्ट देवटोक(शिर्शी) चे अध्यक्ष संत मुर्लीधर महाराज, उपस्तीत होते. यावेळी ट्रस्ट च्या वतीने स्थळाच्या विकासासाठी निधी मंजूर करावे या साठीचे पालकमंत्री ना.वडेटटीवार यांना निवेदन दिले.

Previous articleभवंस स्कूल ने फीस में दी 15, प्रतिशत की छूट
Next articleगडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठली पाहिजे – ना. विजय वडेट्टीवार