Home संपादकीय पत्रकार भगवंत पोपटे यांचे कोरोणा आजारातंर्गत दु:खद् निधन मनला चटका लावून गेलाय.....

पत्रकार भगवंत पोपटे यांचे कोरोणा आजारातंर्गत दु:खद् निधन मनला चटका लावून गेलाय.. — निर्भिड पत्रकार म्हणून असलेली ओळख अखेर शांत झाली..

431

 

प्रदीप रामटेके
मुख्य संपादक

स्मृतीशेष भगवंत पोपटे म्हणजे आंबेडकर चळवळीतील खंदे कार्यकर्ते.तद्वतच दखल न्युज भारतचे उपसंपादक व दैनिक विदर्भ कल्याणचे सिंदेवाही तालुका प्रतिनिधी.भंगवंत पोपटे एक आदरयुक्त व्यक्तीमत्व होते,याच बरोबर ते निर्भिड पत्रकार होते.त्यांच्या दु:खद् निधनाची बातमी कानावर पडताच,अक्षरशः मन हेलावून गेले..त्यांचा मृत्यू मनाला चटका देणाराच ठरला..!

भगवंत पोपटे हे चंद्रपूर जिल्ह्यातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा नेरी येथील मुळचे रहिवासी.कालांतराने व्यवसायाला अनुसरून त्यांनी कुटूंबासह तालुक्याचे स्थळ असलेल्या सिंदेवाही येथे राहणे सुरू केले व तिथलेच रहिवासी झाले.आंबेडकर चळवळीत कार्य करताना त्यांच्या बेधडक वृत्तीचे दर्शन झाले.आजच्या स्थितीत ते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य होते.

पत्रकारिता क्षेत्रातील त्यांचा निर्भिडपणा व निष्पक्षपणे लिहिण्याची त्यांची तत्पर कार्यपद्धत,सोधक वृत्ती आणि कणखरपणा,बऱ्याच वाचकांना वेड लावायचा.डंकेकीचोटपर पत्रकारिता करण्याची त्यांची संवेदनशीलता बऱ्याचदा न्यायसंगत ठरली.

वैयक्तिक रित्या ते एवढे मनमिळावू होते की,आदरभाव कसा व्यक्त करायचा व सन्मान कसा द्यायचा,”हे,ते न बोलता सांगायचे.संकट काळात धावून जाण्याची व सहकार्य करण्याची त्यांची वृत्ती अतिशय प्रेरणादायी होती.

भगवंत पोपटे कोरोणा संक्रमीत झाले तेव्हा सर्व प्रकारची हकिकत एक जवळचा मित्र म्हणून मला सांगितली होती व उपचार करण्यासबंधाने व्यक्तीश: माहिती दिली होती.उपचारा संबंधातील बरेच गुपिते मी त्यांना सांगितले होती.परंतू त्यांच्या मृत्यूचा क्षण जवळ आला होता असेच म्हणावे लागेल.उपचारासाठी त्यांना प्रथमतः ब्रम्हपूरी येथील आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.परंतू गुरुवारला प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले होते.आज साडेसहा वाजताच्या दरम्यान सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

वयाच्या ७० वर्षांनंतर सुध्दा ते ज्या तरुणाईने कार्य करीत होते,ते कार्य अचंबित करणारे व मनाला मार्गक्रम करणारे होते.स्मृतीशेष भगवत पोपटे हे “दखल न्युज भारतला,मोठे करण्यासंबंधाने श्रम घेण्यास नेहमी जागरूक असायचे,”दखल न्युज भारत,बाबत कुठल्याही प्रकारची वेदना-संवेदना,ते अगदी खुलासेवार सांगत.तद्वतच ३ महिन्यांपासून दैनिक विदर्भ कल्याणचे सिंदेवाही तालुका प्रतिनिधी म्हणून काम बघत होते.दैनिक विदर्भ कल्याणच्या उभारणी साठी जाहिरातीच्या माध्यमातून सहकार्य निश्चित करणार असे ते मला उपचाराला जातांना बोलून गेले.

त्यांचे प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकाऱ्यांसी व कर्मचाऱ्यांसी ऋणानुबंध जवळीकतेचे होते.राजकीय व सामाजिक संघटने अंतर्गत त्यांचा मोठा आप्तपरिवार होता.त्यांच्या मृत्यू मुळे आप्तपरिवाराला धक्का बसला असून,अतिशय शोकमग्न परिवार झाला आहे.

आयुष्यमान भगवंत पोपटे हे माझे अगदी जवळचे मित्र असल्याने,त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच माझे मन तर अक्षरशः गहिवरून गेले.त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सारखा एक चांगला पत्रकार मित्र व उतंम सहकारी सस्नेही गमावला आहे.

दखल न्युज भारत परिवारातर्फे व दैनिक विदर्भ कल्याण परिवारातर्फे त्यांनी मनस्वी भावपुर्ण श्रद्धांजली!

Previous articleकृषी विभाग तर्फे घरच्या सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी चे प्रात्यक्षिक
Next articleप्रेमप्रकरणातून आई-वडिलांचा अपमान, फेसबुक लाईव्ह करत तरुणाची आत्महत्या