Home गडचिरोली जिल्ह्यातील दारु बंदी उठवून मोहफुलावर आधारित दारू कारखाना सुरू करा गडचिरोली...

जिल्ह्यातील दारु बंदी उठवून मोहफुलावर आधारित दारू कारखाना सुरू करा गडचिरोली जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार रामकृष्ण मडावी याची राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे निवेदनातून मागणी

404

 

देवानंद जांभूळकर जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

जोगीसाखरा- गडचिरोली या जंगलव्याप्त जिल्ह्यात मोहफुलांचे उत्पादन भरपूर प्रमाणात होत असून त्यामानाने त्याला भाव मिळत नाही.त्यामुळे मोहफुलांचे खुली बाजारपेठ करण्यात आली तसेच जिल्ह्या लगतच असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याची दारु बंदी उठवली तसीच गडचिरोली जिल्ह्यातील दारु बंदी उठऊन मोहफुलावर आधारीत दारूचा कारखाना उभारण्यात यावा मिळणाऱ्या उत्तपणातून जिल्ह्याच्या विकासात भर घालावी अशी आग्रही मागणी गडचिरोली जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार रामकृष्ण मडावी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे निवेदनातून केली आहे

महाराष्ट्र शासनाने गडचिरोली जिल्ह्यात1993 पासून दारूबंदी जाहीर केली पण ही दारूबंदी कागदोपत्री राहिली.जिल्ह्यात दारुबंदी असूनही ही दारूबंदी यशस्वी करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे विदारक चित्र सर्वत्र दिसत आहे.त्यामुळे जिल्ह्यात बाहेरचे काही समाज सेवेचे कोरडे ठेकेदार बसलेले आहेत आणि वारंवार दारु महाराष्ट्र व देशात सुरू असताना गडचिरोली जिल्ह्यात बंद असावी म्हणून जे समाज सेवेचे बाहेरुन आलेले ठेकेदार आहेत यांचा जिल्हाशी कुठलाही समंध नाही तर या ठेकेदारामुळे जिल्ह्यातील दारु कागदोपत्रीच बंद आहे. या ठेकेदारानी समाज सेवेच्या नावाखाली किती पैसे कृटुन कुठुन येतात याचाही आडिट व्हावा तसेच या जिल्ह्यात येऊन शासकीय जागा हडपलेल्या आहेत याची चौकशी होणे गरजेचे आहे असे फसवे असलेल्या दारुबंदीमुळे मिळणाऱ्या महसूलपासून वंचीत राहावे लागत आहे.दारूमुक्त जाहीर झालेल्या गडचिरोली जिल्ह्यात प्रत्यक्ष मात्र दारुयुक्त असणारा जिल्हा आहे.दारूबंदी झाली ती फक्त कागदोपत्री, पण प्रत्यक्षात गडचिरोली पासून जिल्ह्यातील खेड्यापाड्यात सर्वत्र दारू मिळते. एकंदरीत यामुळे शासनाला मिळणार महसूल बुडत आहे.
त्यामुळे जिल्ह्यात दारू दुकाने पूर्ववत सुरू करा , जेणेकरून शासनास महसूल मिडेल व त्या महसुलामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी हातभार लागेल. जिल्ह्यातील दारूबंदी उठवून गडचिरोली जिल्ह्यात मोहफुलाचा कारखाना सुरू केल्यास तो फायदेशीर ठरेल. मोहफुलची खुली बाजारपेठ व कारखाना उभारल्यास या उद्योगविरहीत गडचिरोली जिल्ह्यात रोजगार प्राप्त होईल, वनसंपदेचा लाभ जिल्ह्यातील नागरिकांना होईल जिल्ह्यात दारूबंदी असुनही देशी, विदेशी, व गावठी मोहफुलांचे दारूविक्री सरासपणे सुरू आहे. दारुतून मिळणारा जिल्ह्यातील पैसे वापरून पश्चिम महाराष्टातिल द्राक्ष उत्पादक गलेलठ्ठ बनले आहे. जिल्ह्यातील नैसर्गिक देणं असलेल्या वनसंपदेमध्ये मोहफुलांचा फार मोठा वाटा आहे.येथील मोहफुल अत्यन्त पौष्टिक स्वरूपाचे आहे.
जिल्ह्यात उद्योगाचे कोणत्याही प्रकारची साधने नसल्याने येथील युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे येथील जनतेला त्यापासून वंचीत ठेवण्यासाठी समाजसेवेचे ठेकेदार कारणीभूत आहे तसेच दारु मुळे उदत्वत झालेल्या लोकांचे आता पर्यंत किती कृटुब सुधारले असते तर बेरोजगारी वाढली नसती .त्यामुळे जसी चंद्रपूर जिल्ह्यातील दारु बंदी उठवली त्याच धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला व बरोजगारांना न्याय देण्यासाठी दारूविक्री सुरू करून बुडणारा महसुल वाचवून जिल्ह्याच्या विकासासाठी तो खर्च करण्यात यावा.बेरोजगारी दुर करण्यासाठी जिल्ह्यात मोहफुलाची बाजारपेठ उपलब्ध करून दारूचा कारखाना प्रशासनाने उभारून जिल्ह्यच्या विकासासाठी हातभार लावावा अशी मागणी गडचिरोली जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार रामकृष्ण मडावी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे निवेदनातून केली आहे केली आहे.

Previous articleमौजे वार व सांजोरी येथे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना बिज प्रक्रिये चे महत्व व त्यातुन 10% रासायणिक खतांच्या खर्चात बचत करणे संबधी मार्गदर्शन
Next articleराष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य धनादेश वितरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिरोंचा तालुका अध्यक्ष तथा उपसरपंच श्रीनिवास कडार्ला यांच्या हस्ते