Home महाराष्ट्र लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढणार; नवी नियमावली येणार

लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढणार; नवी नियमावली येणार

304

 

हर्ष साखरे दखल न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 1 जून पर्यंत महाराष्ट्रातील सर्व भागांमध्ये लॉकडाऊन घोषित केला होता. 1 जूननंतर लॉकडाऊन उघडणार अशी शक्यता वर्तवण्यात येत असतानाच लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढवण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील कोरोनाची परिस्थिती सुधारताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर रुग्णसंख्या कमी होत असताना पॉझिटिव्हिटी रेट अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे टेस्टिंगचं प्रमाण वाढवण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याचं आरोग्यमंत्री यांनी स्पष्ट केलं.

आज महाराष्ट्रातील कोरोना आढाव्याची बैठक पुण्यामध्ये पार पडली. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत केलेल्या घोषणेमुळे 1 जूननंतर महाराष्ट्रातील लॉकडाऊन पूर्णपणे उघडणार या अपेक्षेवर असलेले नागरिक काही प्रमाणात निराश झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत नवीन नियमावली 1 जूनला जाहीर करण्यात येईल. तसेच शिथीलतेबाबत स्थानिक प्रशासनातील जिल्हाधिकाऱ्यांना पूर्णपणे अधिकार दिले जाणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं. तसेच खाजगी रुग्णालयातील अवाजवी बिल आकारण्याचा मुद्दा उपस्थित झाल्याने रुग्णालयाचं प्रत्येक बिल आता तपासलं जाईल, असं आरोग्य मंत्री यांनी जाहीर केलं आहे

Previous articleपंचायत समिती पारशिवनी सभापती यांच्या प्रयत्नाने अपंग शिला मारबते या महिलेला ट्रायसिकल भेट.
Next articleजिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची जि.प.पं.स.सदस्य असोसियन गडचिरोली जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती