Home नागपूर मौजा चारगाव शिवारात झाड़वरून खाली पडल्याने उपचारा दरम्यान मुत्यु.

मौजा चारगाव शिवारात झाड़वरून खाली पडल्याने उपचारा दरम्यान मुत्यु.

144

 

*पारशिवनी* (ता प्र):-पारशिवनी तालुक्यातील मोजा चारगाव येथील रामदास नारायण चौधरी (वय ४७) यांचे गुरुवारी (२७ मे) झाडावरून पडून अपघाती निधन झाले.
सुत्रानुसार सविस्तर वृत्त असे की फिर्यादी गोविंदा नारायण चौधरी वय ४५वर्ष राहणार चारगाव यांचे तोडी रिर्पोट नुसार पाराशिवनी पोलीसानी कलम ७४नुसार गुन्हा नोंद केला , मृतक रामदास नारायण चौधरी वय ४७वर्ष राहणार चारगांव यांने उदरनिर्वाह करण्यासाठी गावातील शिवारात भाड्याने शेती केली होती. तो शेतीत पिके उत्पन्न घेण्यासाठी दैनंदिन सकाळी शेतीची मशागत व अन्य कामे करण्यासाठी शेतात जायचा. त्यानुसार तो गुरुवारी सकाळी शेतात गेला व काही आवश्यक कामासाठी कडु लिबां चे झाडावर लाकूड तोडायला शेतातील कडुलिबांचे झाडावर चढला. तेव्हा झाडाची फांदी तोडताना त्याचा तोल गेला आणि झाडावरून खाली पडला. त्यामुळे त्याला अंदरूनी जबर मार लागल्याने खूप वेळ शेतात पडूनच राहिला. शेजारी शेतकर्‍याला तो पडून दिसला, ही माहिती त्यांनी घरी व गावात सांगितली. त्यावरून त्याचे भाऊ फिर्यादी गोविंदा चौधरी यांनी त्याला घरी आणले व उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केन्द्र नवेगांव खैरी येथे नेताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. नंतर डाक्टर यांनी मृत घोषित केले घटनेची माहिती पारशिवनी पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यामुळे, पोलिस मेजर शिदें व सिपाई रवि बर्वे घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पारशिवनी येथील ग्रामिणा रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांना सोपविण्यात आले असून, चारगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पाडले. त्याच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा व बराच मोठा आप्तपरिवार आहे. घटनेचा पुढील तपास पारशिवनी पोलिस निरिक्षक संतेतष वैरागडे यांचे मार्गादर्शनात बिट इंर्चाज पुढील तपास करीत आहेत.

Previous articleवैरागड येथील प्रल्हाद शेंडे यांचा लकव्याने निधन.
Next articleपंचायत समिती पारशिवनी सभापती यांच्या प्रयत्नाने अपंग शिला मारबते या महिलेला ट्रायसिकल भेट.