प्रतिनिधी//प्रलय सहारे
वैरागड : – येथील बाजार टोलीवर रहिवासी असलेले प्रतिष्ठित नागरिक प्रल्हाद शंकर शेंडे (वय 73 वर्षे) यांचे लकवा या आजाराने आज दि. 28 मे रोजी सकाळी 10 वाजताच्या दरम्यान राहत्या घरी निधन झाले.
आज संध्याकाळी त्यांच्यावर कढोली रोड वरील म्हशानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सूना, भाऊ, नातवंडे आणि मोठा आप्त परिवार आहे.