Home Breaking News महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातील “महाएल्गार आंदोलन आमदार डॉक्टर देवरावजी होळी

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधातील “महाएल्गार आंदोलन आमदार डॉक्टर देवरावजी होळी

167

अशोक खंडारे विभागीय प्रतिनिधी
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात १८जिल्हा परिषद क्षेत्र व तिन्ही तालुका केंद्रावर आंदोलनास सुरुवात
कोरोना काळातील मागील ४ महिन्यांचे वीजबिल माफ करावे व दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर १० रुपये सबसिडी देण्यात यावी या प्रमुख मागणी करिता महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील १८जिल्हा परिषद सर्कल मध्ये व गडचिरोली शहर ,चामोर्शी व धानोरा नगर पंचायत क्षेत्रात दिनांक १ ऑगस्ट ला आज दु १२ वा. महाएल्गार आंदोलन सुरू करण्यात आले आहे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी महविकास आघाडी सरकार चा निषेध केला राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून प्रत्येक गोष्टींमध्ये जनतेला वेठीस धरण्याचे काम हे सरकार करीत आहे . अगोदरच आर्थिक अडचणीत असणाऱ्या सामान्य माणसाला कोणताही आधार न देता उलट विजेचे ४ पट बिल देऊन मोठा धक्का दिला आहे.तसेच दूध उत्पादकांना भाजपा सरकारच्या काळात देण्यात येणारी प्रती लिटर ५ रु सबसिडी बंद करून राज्यातील जनतेवर राज्यातील शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या महाविकास आघाडीच्या सरकारने मोठा आघात केला आहे.कोरोणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकार सामान्य जनतेच्या भावनांशी खेळत असल्याने व सर्वच कामात अपयशी ठरलेल्या या सरकारने आता जनतेच्या विरोधात निर्णय दिल्यास त्याचे गंभीर परिणाम या सरकारला भोगावे लागतील असा इशाराही आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सरकारला दिलेला आहे . सरकारने तातडीने कोरोना लाकडाऊन काळातील मागील ४ महिन्यांचे वीजबिल माफ करावे व दूध उत्पादकांना प्रती लिटर १० रुपये सबसिडी द्यावी, दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर देण्यात यावा ,दूध भुकटीच्या निर्यातीला प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्यात यावे अशी मागणी घेवून महाविकास आघाडी सरकार च्या विरोधात “महाएल्गार आंदोलन” करण्यात येत असल्याची माहिती आमदार डॉ देवराव जी होळी यांनी दिली आहे. या आंदोलनामध्ये जनता पार्टी च्या पदाधिकारी व कार्यकर्ते हजारों चा संख्येने उपस्थित राहनार आहेत यावेळी बोलतांना आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी सांगितले सदर आंदोलन तमाम कार्यकर्त्यांनी यशस्वी करावे असे आव्हान केले आहे.

Previous articleकिराड समाज भुजलिया स्नेह मिलन कार्यक्रम कोरोनामुळे रद्द.  भुजलिया उत्सवावर कोरोनाचे सावट
Next articleराजे धर्मराव हायस्कूल आष्टी चा निकाल 95.53 टक्के