प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होऊन सहा वर्षे झाली तरी दारूबंदी दरम्यान दारू जशी राजरोसपणे विकल्या जात होती तशी पोलिसाद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत पकडल्या सुद्धा जात होती .मागील तीन वर्षात पकडलेला एकूण तीन कोटी रुपयांची अवैध दारूसाठा दिनांक 28 मे रोजी आठ ते दहा ट्रॅक्टर वर लागून घुग्घुस जवळील गुप्ता कोल वाशरीज पाशी खाली जागेत बुलडोजर चालवून नष्ट करण्यात आला.
सदर अवैध दारूसाठा हा 2017 ते 2020 दरम्यान च्या तीन वर्षांमध्ये एकून 388 कारवाईमध्ये जप्त करण्यात आला होता .न्यायालयाच्या आदेशाने हा साठा नष्ट करण्यात आल्याचे समजते. 2020 ते 2021 या एक वर्षात जप्त करण्यात आलेल्या दारूच्या साठ्याची सुद्धा विल्हेवाट लावण्याचा न्यायालयाचा आदेश सुद्धा प्रस्तावित असून आदेश मिळताच हा साठा सुद्धा त्वरित नष्ट करण्यात येईल असे कळते .पोलिसांनी दारू नष्ट करण्याच्या या कारवाई दरम्यान उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी तसेच पोलिस अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते.