अकोट प्रतिनिधी
स्वप्निल सरकटे
स्थानिक जय हिंद चौक जुने शहर भिसे हॉस्पिटल येथील डॉ. पियुष भिसे यांच्या हलगर्जी, दुर्लक्षामुळे, व चौकीचे औषधोपचार केल्यामुळे पंडित समीर आयाचीत महाराज यांचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाला ? याबाबत चौकशी करण्यात यावी व दोषी डॉक्टर यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.असे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे म.रा.चे उपाध्यक्ष शैलेश अलोने यांनी दिले.
संघटनेचे पदाधिकारी, साप्ताहीक स्वराज्य गर्जनाचे उपसंपादक पंडित समीर कमलाकर आयाचीत (महाराज) राहणार काळा मारोती रोड जुने शहर अकोला ह्यांना ताप व खोकल्याचा आजार असल्यामुळे ते डॉ. पियुष भिसे यांच्या भिसे हॉस्पिटल(ईन्फीनीटी हेल्थ केअर) जय हिंद चौक जुने शहर या ठीकाणी दि.12/5/2021रोजी इलाज उपचारासाठी भरती झाले होते.डॉ.भिसे यांनी कोरोना झाल्याचे निदान करुन इलाज उपचार चालु केला पंरतु दोन दिवसानंतर डॉ.पियुष भीसे हे बाहेरगावी नीघुन गेले. व त्यांचे अधिनस्त कर्मचारी व्यक्तीवर संपूर्ण हॉस्पिटलची जवाबदारी सोपवली. त्यांनी योग्य उपचार केला नाही. पेशंटला त्याचे नातेवाईक, पत्नीला भेटू दिले नाही. काय उपचार चालू आहे याची माहिती दिली नाही. दुर्लक्ष केले. सदर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन व्हेंटिलेटर ची सुविधा सुद्धा नाही. स्टेशनला सहा रेमडेसीवर इंजेक्शन दिले. हलगर्जी व योग्य उपचाराअभावी पेशंट सिरीयस झाल्यामुळे त्यांना शासकीय महाविद्यालयात रुग्णालयात हलविण्याचे सांगितले.त्यानुसार दि. 18/5/2021रोजी पेशंटला ॲम्बुलन्समध्ये ठेऊन पाठविण्यात आले. परंतु ॲम्बुलन्समध्ये मध्येच समीर अयाचीत मृत्यू पावले असल्याचे निदान तेथील डॉक्टरांनी केले. या सर्व प्रकाराबाबत संबंधित डॉक्टर पियुष भिसे हेच पूर्णपणे जबाबदार असून त्यांच्यावर मनुष्य सदोष वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. योग्य कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात येत आहे.