Home नागपूर किराड समाज भुजलिया स्नेह मिलन कार्यक्रम कोरोनामुळे रद्द.  भुजलिया उत्सवावर कोरोनाचे...

किराड समाज भुजलिया स्नेह मिलन कार्यक्रम कोरोनामुळे रद्द.  भुजलिया उत्सवावर कोरोनाचे सावट

129

 

कमलसिह यादव
पारशिवनी तालुका प्रातिनिधी
दखल न्युज भारत,नागपुर

कन्हान : – कोरोना विषाणु चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन किरात, किराड समाज बाधवा व्दारे रक्षाबंधन निमित्य भुजलिया स्नेहमिलन कार्यक्रम या वर्षी रद्द (स्थगित) करून स्वत:च्या घरीच भुजलिया पुजन व विसर्जन वैयक्तिक रित्या साजरा करण्यात येणार आहे.
किरात, किराड समाज भुजलिया उत्सव समिती व्दारे श्री दारोडे यांच्या अध्यक्षेत छोटीखानी बैठक घेऊन कन्हा न येथे दरवर्षी साजरा करण्यात येणारा रक्षाबंधन निमित्य भुजलिया उत्सव या वर्षी देशात, राज्यात, जिल्हयात कोरोना विषाणु संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव रोखण्या च्या पार्श्वभूमीवर, सामाजिक हित लक्षात घेऊन स्थगित (रद्द) करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे. यास्तव रामटेक लोकसभा क्षेत्रातील किरात किराड समा ज बांधवानी येत्या दि.०४ ऑगस्ट ला रक्षाबंधन निमित्य सार्वजनिक भुजलिया उत्सव रद्द करण्यात आल्याने समाज बांधवानी स्वत:च्या घरीच भुजलिया पुज न व विसर्जन करून वैयक्तिक रित्या सरकारच्या नियमाचे पालन करून साज रा करावा.असे आवाहन श्री नारद दारोडे हयानी केले आहे. याप्रसंगी राधेश्याम हारोडे,राजुजी काठोके,नरेश गडे,अशोक खंडाईत, मनोहर बादुले, नत्थुजी नन्होरे, रामराव लुहुरे, अन्ना लुहुरे, पंचम कारोंडे, निलकंठ लुहुरे, माधव काठोके, केशवरा व मोहने, दिपक हारोडे, प्रेमदास मोहने, प्रल्हाद बालकोटे, सेवक लुहुरे, श्रावण लुहुरे, सौ चम्पाबाई दारोडे, सौ किशोरी काठोके, अर्चना काठोके, चंदाबाई लुहुरे, कल्पना गडे, कल्पना हारोडे, आकांशा दारोडे, कु राखी लुहुरे आदी उपस्थित होते.

Previous articleजनता करिअर लाँचर तथा जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सोहळा संपन्न
Next articleमहाविकास आघाडी सरकारच्या विरोधातील “महाएल्गार आंदोलन आमदार डॉक्टर देवरावजी होळी