Home यवतमाळ छोरीया ले आऊट मध्ये साई अपार्टमेंटम च्या तिसऱ्या माळ्यावर भिषण आग, अग्निशमन...

छोरीया ले आऊट मध्ये साई अपार्टमेंटम च्या तिसऱ्या माळ्यावर भिषण आग, अग्निशमन दलाच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण,लाखो रुपयाचे नुकसान

630

 

वणी : परशुराम पोटे

शहरालगत असलेल्या गणेशपुर येथील छोरीया ले – आऊट मधील साई अपार्टमेन्ट या सदनिके मध्ये तिसऱ्या मजल्यावर भिषन आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे अग्नि शमन दलाच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असुन मोठी हानी टळली,
गुरुवारी रात्री दि.27 मे रोजी 8:00 वाजताचे दरम्यान छोरीया ले आऊट मधिल साई अपार्टमेंटम च्या तिसऱ्या माळ्यावर असलेल्या आकाश शर्मा यांचे सदनिकेत आग लागली होती या घटनेची माहिती वणी नगर पालिकेच्या अग्नि शमन दलाला मिळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व 10 वाजताचे दरम्यान अग्निशामक दलाला आग विझविण्यात यश आले. मात्र या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसुन लाखो रुपयांची वित्त हानी झाल्याचा प्राथमीक अंदाद आहे.यावेळी वणी नगर पालिकेचे मुख्यधिकारी रविन्द्र कापशीकर, पोलीस प्रशासन तसेच अग्निशमन दलाचे देवीदास दाधव, शाम तांबे यांनी आग विझविण्यात मोलाचे सहकार्य केले.

Previous articleरंगनाथ चौकातील एका छोट्या मास्क विक्रेत्यावर कारवाई मात्र त्याचं परीसरातील दिवसभर सुरु असलेल्या कोंबड्याचे दुकान वाल्यांना मुभा! प्रशासनाचा अजब कारभार चव्हाट्यावर
Next articleवैरागड येथे बौद्ध पौर्णिमा उत्सात साजरी.