कन्हान (ता प्र): – कांद्री यथिलऑर्चिड लॉज कांद्री येथे कोव्हीड-१९ शासनाच्या निर्गमित नियमावली चे पालन न करित क्षमतेपेक्षा जास्त महिला पुरूषाना प्रवेश दिल्याच्या गुप्त माहीती वरून कन्हान पोलीसांनी केलेल्या तपा सणीत लॉज मध्ये संचारबंदी व शासनाच्या नियमाव ली व अटीशर्तीचे उल्लघन केल्याचे आढळल्याने कार्यवाही करण्यात आली.
मंगळवार (दि.२५) मे ला सायंकाळी ५ वाजता दरम्यान मिळालेल्या गुप्त माहीती वरून कन्हान पोलीस निरिक्षक अरूण त्रिपाठी यांचे आदेशाने पोलीसांनी जाऊन नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ टेकाडी येथील ऑर्चिड लॉज येथे तपासणी केली असता वातानुकुलीक व अवातानुकुलीक खोल्या असुन क्षमतेपेक्षा जास्त महिला पुरूषा ना प्रवेश दिला होता. कोव्हीड (आरटीपी सीआर) तपासणी केली नसुन कोव्हीड १९ च्या प्रतिबंधक शासनाच्या निर्गमित संचारबंदी व नियमावली उल्लघन करून लॉज चालु ठेवल्याचे आढळुन आल्याने कन्हान पोलीसांनी आरोपी आकाश प्रकाश कापसे वय २३ वर्ष रा. सोनी लेआऊट कांद्री यांचे विरूध्द अप. क्र १५१/२१ ने गुन्हा नोंद करून कलम १८८, २६९, २७० भादंवि सहकलम २, ३, ४ साथीचे रोग अधिनियम नुसार आरोपी विरूध्द गुन्हा नोंद करून तपासात घेतला. ही कार्यवाही कन्हान पोलीस निरिक्षक अरूण त्रिपाठी यांचे मार्गदर्शनात पो नि क्राईम कदम व पो. उप नि सुनिल अंबरते, पो शि सुधिर चव्हाण, आतिश मानवटकर हयानी यशस्वितेरित्या पार पाडली.