अश्विन बोदेले
तालुका प्रतनिधी
दखल न्यूज भारत
वैरागड :
आरमोरी तालुक्यातील डोंगरतमाशी घाटावरील पुलापासून ते कुरंडीकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याची
कमालीची दुरवस्था झाली आहे.वैरागड मनापूर मार्गावर वैरागडपासून तीन किमी अंतरावर असलेल्या
डोंगरतमाशी घाटावरील खोब्रागडी नदीच्या पुलाच्या दुसऱ्या टोकापासून ते कुरंडीपर्यंत आणि वडेगाव फाट्यापर्यंत हा डांबरी रस्ता ठिकठिकाणी उखडलेला आहे. या मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. डोंगरतमाशी घाटावर पुलाचे बांधकाम झाले, तेव्हापासून या
मार्गाची वर्दळ वाढली आहे. या मार्गाने मेंढा, वडेगाव, सलंगटोला, पिसेवडरधा गावातील नागरिकांची रहदारी राहते. डांबरी रस्त्याचे काम होऊन चारच वर्षांचा कालावधी उलटला आहे. अल्पावधीतच रस्त्याची झालेली प्रचंड दुरवस्था पाहता, हे काम निकृष्ट दर्जाचे
झाले असल्याचे स्पष्ट होते.