Home गडचिरोली जनतेसाठी झटणारा एकमात्र नेता : अजय कंकडालवार

जनतेसाठी झटणारा एकमात्र नेता : अजय कंकडालवार

85

 

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील इंदाराम या छोटयाश्या गावातून आपली राजकीय कारकीर्द सुरू करून सामान्य कार्यकर्ता, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, बाजार समितीचे संचालक ते जिल्हापरिषदेचे अध्यक्ष पदापर्यंत मारलेली मजल ही अजय कंकडालवार यांची ओळख आहे .
अजय कंकडालवार यांनी लाॅकडाऊन काळात अनेकांना मदतीचा हात पुरवला, निवडणुका असो किंवा नसो नेहमी नागरिकांशी संपर्कात असलेला, तत्पर, कार्यक्षम म्हणून अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. त्यांनी लाॅकडाऊन काळात दुसऱ्या राज्यात गेलेल्या मजुरांना आपल्या राज्यात येण्याची सोय करून सोबतच त्यांचा निवासाची, भोजनाची सोय करून दिली. एवढेच नाही तर अनेकांना मदतीचा हात देवून आर्थीक मदत पोहचवली.
जिल्हयातील इतर नेते, लोकप्रतिनिधी हे निवडणुकापुरताच काम करतात, निवडून आले तर आपली खुर्ची गरम करण्याचेचे काम करत असतात व लोकांच्या समस्या जाणुन घेण्याचे काम करीत नाही , तर काहींना निवडणुका जिंकता आली नाही की पाच वर्षे नागरिकांच्या संपर्कात राहत नाही समस्या जाणून घेत नाही व पुर्णतः अज्ञानवासात राहातात व पुन्हा निवडणुका तोंडाजवळ येताच जनतेच्या सामोर येवून आपली वाहवाह जनतेत करीत असतात याला अपवाद म्हणून अजय कंकडालवार आहेत. हे निवडणुका जवळ आले आणि निवडुन आले म्हणूनच नाही तर निवडणुका असो अथवा नसो सदैव जनतेशी एकनिष्ठ व संपर्कात असलेला नेता म्हणून ओळख आहे. जिल्हयातील प्रत्येक निकडणुकीत त्यांचा सक्रीय सहभाग असतोच त्याचप्रमाणे अनेक कार्यक्रमाला आदराने दिलेल्या आमंत्रणाला स्विकारून कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवित असतात. जिल्हयातील दुर्गम भागात मेळाव्याचे आयोजन करून तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, तसेच परिसरातील संपुर्ण बाबींचा आढावा घेऊन समस्या दुर करून तेथील जनतेशी त्यांच्या भाषेतच संवाद साधून समस्या सोडविणे, अपघात ग्रस्तांना आर्थीक मदत पुरविणे, मृतकाच्या घरी सांत्वना भेट देवून आर्थीक मदत करणे, कार्यकर्त्यांशी कोणताही दुजाभाव न करता मनमोकळेपणाने संवाद साधने, नागरिकांच्या समस्या परस्पर जाणून घेणारा एकमेव नेता म्हणूनही त्यांच्याकडे बघीतले जाते.
अजय कंकडलवार हा एकमेव जिल्हयातील सक्रीय नेता आहे जेे नागरिकांच्या समस्या परस्पर जावून सोडवित असतो. यांनी जिल्हयातील दुर्गम अतिदुर्गम भागाचे दौरे करून नागरिकांच्या समस्या सोडविल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हयाचा सर्वांगिन विकास हाच ध्यास घेवून आरोग्य,शिक्षण, कृषी, बांधकाम अशा सर्वच क्षेत्रात जातीने लक्ष देवून जिल्हयाच्या विकासासाठी झटणाऱ्या अशा नेत्याची जिल्हयाला आवश्यकता आहे. अजय कंकडालवार पुढील जिल्हा परिषद निवडणुकीत निवडुन येणे निश्चीत असून यावेळी आविस चा एकहाती सत्ता यांच्या नेतृत्वात येण्याची शक्यता नाकारता येत नाहीे. तसेच अहेरी नगरपंचायत निवडणुकीत यांच्या नेतृत्वात निवडणुक लढणार असून अहेरी नगरपंचायतमध्ये सुध्दा सत्ता स्थापन करण्याची दाट शक्यता आहे.

Previous articleनिरा नरसिंहपुर परिसरात अवकाळी पावसाने झोडपले केळी बागा फळबागा ऊस या पिकांचे राहत्या घरांचे अतोनात नुकसान
Next articleकंटुले कुटुंबीयांचे सांत्वन मा.आ. सुरेशकुमार जेथलीया ,कॉ.जिल्हा आध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली भेट