Home पुणे सांगरूण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे इमरतीची दुरुस्ती करावी व नागरिकांसाठी पत्र्याचे शेड...

सांगरूण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे इमरतीची दुरुस्ती करावी व नागरिकांसाठी पत्र्याचे शेड उभारावे, शिवसेनेची मागणी.

108

अतुल पवळे पुणे जिल्हा प्रतिनिधी
शिवसेना खडकवासला मतदार संघातील पदाधिकाऱ्यांनी नुकतीच सांगरून आणि खेडशिवापुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट दिली. या केंद्रांच्या भागातील कोरोना आणि लसीकरण याची माहिती घेतली व यात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. सांगरून येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पावसाळ्यात गळत असून तिची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. तसेच लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना बाहेर उन्हात उभे राहावे लागते. पावसाळ्यात कठीण परिस्थिती होऊ शकते. म्हणून या ठिकाणी तातडीने इमारत दुरुस्ती आणि पत्र्याचे शेडसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी जिल्हापरिषदेकडे करण्यात आली. तसेच या दोन्ही केंद्रांना अँबुलन्स देण्यात आल्या आहेत पण ड्रायव्हर आणि डिझेलची व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या उभ्या आहेत अशी तक्रार उपस्थित नागरिकांनी केली. जिल्हा परिषदने तातडीने हि व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रसंगी सांगरून प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसाठी शिवसेनेतर्फे पीपीई कीट डॉ. अनिल जोशी आणि फार्मासिस्ट प्रविण जिंदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना विधानसभा प्रमुख नितीन वाघ, तालुका प्रमुख बुवा खाटपे, संतोष शेलार, सुशांत खिरीड, सुनिल पायगुडे, उपसरपंच विकी मानकर, तेजस राऊत, सौरभ मोकाशी, मंदार निघोट, नंदू कांबळे हे उपस्थित होते.

Previous articleकोरोनावरील ” जितेंगे हम” लघुपट कोरोना जनजागृतीसाठी उपयोगी
Next articleशिवगंगा खोऱ्यातील युवा गिर्यारोहकाचा शिवसेनेतर्फे सत्कार.