Home गडचिरोली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावर सभापती ने आक्षेप घेतल्यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांचा संताप उफाळून...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषावर सभापती ने आक्षेप घेतल्यामुळे महाराष्ट्रातील शिवभक्तांचा संताप उफाळून आला असुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा नी सभापतीनां जय भवानी-जय शिवाजी लिहुन शेकडो पोष्ट कार्ड पाटवले

200

 

पंकज चहांदे
तालुका प्रतिनीधी
देसाईगंज/वडसा
दखल न्युज भारत

देसाईगंज: मागील दिनांक 22-7-2020 ला राज्यसभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज राजे उदयन राजे भोसले यांनी राज्यसभेची सदस्य पदाची शपथ घेतल्या नंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा व मां भवानी चा जय घोष केला. त्या नंतर राज्यसभेचे सभापती माननीय व्यंकय्या नायडू (उपराष्ट्रपती) साहेब यांनी. आक्षेप घेऊन राजेनीं जो घोषवाक्य दिले ते वाक्य शपथ रेकॉर्डिंग मधून कट करण्यास सांगितले हे कृत्य आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व मा भवानी चे अपमान करणारे आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस च्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आणि आज दिनांक 31-07-2020 रोज शुक्रवार ला पोस्ट ऑफिस देसाईगंज येथे पोस्ट ऑफिस मध्ये पोष्ट कार्ड वर जय भवानी – जय शिवाजी लिहून शेकडोंच्या संख्येने पोस्टकार्ड मा. सभापती साहेबांना पाठविण्यात सभागृहात शपथ घेताना जनभावना आणि श्रद्धा याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे.
राष्ट्रवादी कांग्रेस तू जीती रहे तूने शेर के बच्चे पाले,
कुछ हुए गद्दार तो क्या
हम जैसे करोड़ों तेरे रखवाले
जय राष्ट्रवादी कांग्रेस
जय भारत
यावेळी मोहम्मद युनूस शेख प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश, जिल्हा सरचिटणीस श्यामजी धाईत, क्षितीज उके तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देसाईगंज. भुवन लिल्हारे जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक,साहीत्यीक व कला विभाग, महादेवजी कावळे जिल्ह.चिटणीस,मिलिंद सपाटे युवा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, कपिल बोरकर सोशियल मीडिया विभाग तालुका अध्यक्ष देसाईगंज, सूरज पारधी तालुका अध्यक्ष रा. कां.ओबीसी सेल, नजमा पठाण महिला शहर अध्यक्ष, द्रौपदी सुखदेव जिल्हा सरचिटणीस सेवादल, मनोज ढोरे ता. सचिव रा.कां, रवी रणदिवे ता. अध्यश सेवादल. रामभाऊ साखरे शहर सचिव रा.कॉं.पा. शैलेश पोटुवार जेष्ठ पदाधिकारी रा.का.पा. अविनाश राघोर्ते, बाबल हाश्मी, विलास कावडे, छोटु ताडपल्लीवार, तसेच समस्त पदाधिकारी व कार्यकर्ते गण उपस्थित होते.

Previous articleआरक्षणाच्या नावाने बोंबा मारणाऱ्यांनो बघा, 500 पैकी 500 गुण मिळवून सर्वोत्तम किर्तीमान करणारी कु. स्नेहल मारोती कांबळे चे यश दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 500 पैकी 500 गुण मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली बौद्ध विद्याथिनी महाराष्ट्र सरकार व राजकीय पुढाऱ्यांकडुन अजुनही पुरस्कारांपासुन कु. स्नेहल उपेक्षित का ?
Next articleजनता करिअर लाँचर तथा जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सोहळा संपन्न