अश्विन बोदेले
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
चामोर्शी:- दि.26 मे, गडचिरोली जिल्ह्यात सद्यस्थितीत जिल्हाभर कोविड 19 लसीकरण मोहीम सुरू आहे.जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सदर कार्यवाही करण्यात येत आहे.चामोर्शी माल ग्राम पंचायत अंतर्गत चामोर्शी येथे दि. 25 मे झालेल्या लसीकरणाला ग्रामपंचायत व उमेद अभियानाच्या माध्यमातून 120 नागरिकांना लस देण्यात आली.
जिल्ह्यात सध्या 45 वर्षाच्या वरील लोकांना लस देणे सुरू आहे.कोविड 19 आजाराला नियंत्रणात आणण्यासाठी लस घेणे हाच सध्यातरी उपाय आहे.परंतु लोकांमध्ये लसीकरणासंबद्धी बरेच गैरसमज असल्यामुळे लस घेणारांची संख्या फारच कमी आहे.म्हणुन मागील महिनाभरापासून जिल्हा अभियान कक्षाच्या सुचनेनुसार उमेद अभियान आरमोरी तर्फे गावागावात लसीकरण करण्याविषयी जागृती करण्यात येत आहे.
तसेच ग्रामपंचायत व महसुल कार्यालय स्तरावरही जागृती करणे सुरू आहे.त्याचीच परिणिती म्हणून काल झालेल्या लसीकरणाला 120 लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. लसीकरणाची पाहणी करण्यासाठी मंडळ अधिकारी आरमोरी व संवर्ग विकास अधिकारी आरमोरी चेतन हिवंज यांनी भेट दिली. दि.5 मे रोजी झालेल्या लसीकरणाला 40 लोकांनी प्रतिसाद दिला होता.त्यामुळे चामोर्शी येथे एकुण लसीकरण 160 झाले आहे.
या लसीकरण मोहीमेसाठी वडधा येथिल आरोग्य अधिकारी व चमू, गावचे सरपंच ज्ञानेश्वर धारणे, ग्रामसेवक बि.एन.कोकोडे, वासाळा येथिल तलाठी आर.एस.करंबे, उमेद चे पशु व्यवस्थापक गोविंदा राऊत व प्रेरिका नलिनी जनबंधू व दिपाली आत्राम, पशुसखी ज्योत्स्ना श्रीरामे, गावच्या पोलीस पाटील एन.एस.मंगरे व बि.एस.राऊत, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर धंदरे, ग्रामपंचायत कर्मचारी संदिप मंगरे व यशवंत वाघ, अंगणवाडी सेविका यांनी सहकार्य केले.